loader
Breaking News
Breaking News
Foto

आदर्श शेतकरी पुरस्कार समीरकुमार आडाव पाटील यांना प्रदान

मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण समितीमार्फत सन 2025- 26 चा देण्यात येणारा तालुक्यातील आदर्श शेतकरी पुरस्कार नुकताच समीरकुमार संतोष आडाव पाटील यांना प्रदान करण्यात आला सदर पुरस्काराची वितरण बळीराम परकर विद्यालयाच्या सदानंद परकर सभागृहामध्ये पार पडला यावेळी एमटीडीसी चे व्यवस्थापक यांच्या हस्ते सपत्नीक पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कर सोहळ्यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी माननीय मेंगाडे साहेब उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संस्थेचे अध्यक्ष मयेकर, सचिव राऊत शाळेचे मुख्याध्यापक व सर्व संचालक शिक्षक वृंद, निवृत्त कृषी अधिकारी, विलास राणे व मंडळ कृषी अधिकारी प्रदीप भुवड उपस्थित होते शेतकऱ्यांच्या प्रति कृतज्ञता तसेच सन्मान म्हणून देणारा हा पुरस्कार शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी आहे समीरकुमार आडाव पाटील हे M.Sc. Horticulture तसेच M.A. Political Science व फार्मसिचे विद्यार्थी असून काही काळ नोकरी करून त्यांनी आदर्श शेती करण्याकडे भर दिला असून आधुनिक शेती पद्धती चा ते अवलंब करत आहेत.

टाइम्स स्पेशल

फळबाग लागवड शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर ठिबक सिंचन जलकुंड सेंद्रिय शेती विविध औषधी व मसाल्याची पिके फळ प्रक्रिया मधुमक्षिका पालन तसेच विविध शेती विषयक कार्यशाळा प्रशिक्षण शेतकरी अभ्यास दौरे यामध्ये त्यांनी चांगले काम केले आहे या कामाची पोचपावती म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg