loader
Breaking News
Breaking News
Foto

निपाणी कर्नाटक येथील शेकडो शेळ्या मेंढपाळ चारापाणी यासाठी गोवा राज्यात रवाना

दोडामार्ग (प्रतिनिधी) - उन्हाळा सुरू झाला की कर्नाटक राज्यातील निपाणी भागातील मेंढपाळ शेतकरी यांच्या समोर पाळलेल्या शेळ्या मेंढ्या यांचा चारा पाणी टंचाई निर्माण होते त्यामुळे हे मेंढपाळ शेतकरी शेकडो मैल प्रवास करत दोडामार्ग तालुक्यात थोडा वेळ थांबून पुन्हा गोवा येथे जाण्यासाठी रवाना होतात. निपाणी येथील शेकडो शेळ्या मेंढ्या घेऊन चार ते पाच कळप गोवा दिशेने रवाना झाले. यामध्ये काही पाळीव जनावरे यांचा देखील समावेश आहे. हे मेंढपाळ मे महिन्यात पुन्हा माघारी फिरून जून महिन्यात पुन्हा शेतीमध्ये लक्ष घालणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निपाणी येथून चार दिवसांपूर्वी निघालेले मेंढपाळ शेकडो शेळ्या मेंढ्या घेऊन दर दिवशी काही किलोमीटर प्रवास करत काही गावात मुक्काम करत निपाणी, गडहिंग्लज, महागाव, नेसरी, चंदगड, तिलारी नगर असा प्रवास करत शुक्रवारी हे मेंढपाळ दोडामार्गमध्ये दाखल झाले. यावेळी मेंढपाळ शेतकरी यांना विचारले असता आमच्याकडे आता चारा पाणी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे शेकडो शेळ्या मेंढ्या यांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर बाब आहे. तेव्हा कोकण तसेच गोवा राज्यातील काही गावात ज्या ठिकाणी गवत, चारा पाणी, उपलब्ध आहे अशा ठिकाणी मुक्काम करून शेळ्या मेंढ्या चरायला सोडल्या जातात. दरवर्षी दिडशे पेक्षा जास्त किलोमीटर पायी प्रवास करून येतो. थकवा जाणवू नये तसेच शेळ्या मेंढ्या इतर पाळीव जनावरे यांना विश्रांती मिळावी यासाठी काही ठिकाणी मुक्काम केला जातो. तीन ते चार महिने गोवा येथे थांबून नंतर पुन्हा परतीचा मार्ग धरला जातो. जून महिन्यात शेती मशागत सुरुवात होते. पाणी चारा समस्या सुटलेली असते असे सांगितले, असे त्यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg