loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई आणि ठाणे शहरात अनेक गुन्हे दाखल गुंड मयुर शिंदेंचा अखेर भाजपात पक्ष प्रवेश

ठाणे प्रतिनिधी) :दिल्लीतील नेत्यांच्या विरोधामुळे गुंड मयुर शिंदेंचा पक्ष प्रवेशाचा पूर्वनियोजित कार्यक्रम काही दिवसांपुर्वी रद्द करण्यात आला असताना अचानक निवडणुकांच्या तोंडावर भाजपने मंगळवारी शिंदेला पक्षात प्रवेश करून घेतला आहे.त्याने २०१७ मध्ये शिवसेनेकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, तेव्हा त्याला उमेदवारी मिळाली नव्हती. यानंतर त्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई आणि ठाणे शहरात हत्या, खंडणी, पोलिसाला मारहाणीचा प्रयत्न, हत्येचा प्रयत्न अशा विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या गुंड मयुर शिंदे याने मंगळवारी अखेर भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मंगळवारी भाजपच्या ठाणे विभागीय कार्यालयात मयुर शिंदे याने जाऊन भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.त्याच्याविरोधा गुन्हे दाखल आहेत. २०११ मध्ये त्याच्याविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाली होती. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना २०२३ मध्ये धमकी आली होती. या प्रकरणात मयुर शिंदे याला अटक झाली होती.मुंबईतून तडीपार केल्यानंतर त्याने ठाणे गाठले होते. तो ठाण्यातील सावरकरनगर भागात राहत असून येथूनच दरम्यान, यंदाही त्याने निवडणुक लढविण्याची तयारी सुरू केली असून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपा त्याला तिकीट देणार का त्याला तिकीट दिल्यावर ठाण्यातील सुशिक्षित मतदार त्याला पसंती देतील का? भाजपाला गुंड मयुर शिंदेंचा किती फायदा होईल हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg