loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली ग्रामोदय फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि.आयोजित राष्ट्रीय कृषि दिनाचा कार्यक्रम उत्साहात

दापोली ( शशिकांत राऊत) --: दापोली येथे डॉ. बाळासाहेव सावंत कोकण कृषि विद्यापीठ व दापोली ग्रामोदय फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि. यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कृषिदिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला . या कार्यक्रमाला डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.मकरंद जोशी , कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ.संतोष वरवडेकर , दापोली ग्रामोदय फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि. कुडावले ,ता.दापोलीचे संस्थापक विनायक महाजन , दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा घाग , दापोली ग्रामोदय फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चे संचालक धनंजय जोशी , एकनाथ मोरे ,डि.जी.रेवाळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रीय कृषिदिनाचे औचित्य साधत शेतमाल विक्री सहाय्य केंद्राचे उद्घाटन डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ . मकरंद जोशी यांचे हस्ते पार पडले. या उद्घाटन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ . मकरंद जोशी यांनी मी लवकरच सेवानिवृत्त होत असून मी सुद्धा भाजिपाला उत्पादन सुरू करणार असल्याचे सांगत आपण स्वतः हून मला ज्ञात असलेल्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करणार आहे. शेतकऱ्यांना भाजीपाला लागवड तसेच शेतीविषयक आवश्यक ते लागवडी संदर्भातील मार्गदर्शन करण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शेती विषयक मार्गदर्शन करण्यास इच्छूक असल्याचे सांगताना विद्यापिठात असणाऱ्या मर्यादा आता असणार नाहीत याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला . तर डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ.संतोष वरवडेकर यांनी राष्ट्रीय कृषी दिनाचे महत्त्व विशद केले. तसेच दापोली ग्रामोदय फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चे संचालक श्री . धनंजय जोशी यांनी शेतकऱ्यांच्या सहभागाने या कंपनीचे कार्य कसे चालते याची माहिती सांगितली.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा भाजीचा टोपला देऊन आदरपूर्वक सन्मान करण्यात आला. तसेच दापोली तालुक्यातील बुजुर्ग शेतकऱ्यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले .या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कंपनी संचालक आणि राज्य शासनाचे कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी एकनाथ मोरे यांनी केले तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन कंपनी संचालक डि जी . रेवाळे यांनी सांभाळले . कंपनी सभासद शेतकरी यांचा या कार्यक्रमातील सहभाग हा उत्स्फूर्त होता . हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कोंकण कृषी विद्यपीठात ज्ञानार्जनाचे धडे गिरवणा-या विद्यार्थ्यांनी मोठी मेहनत घेतली .भाजी गल्लीतील व्यापारी व्यावसायिकांनीसुध्दा उत्तम सहकार्य केले .या कार्यक्रमाची सांगता कुंभवे सुतारवाडी महिला मंडळाच्या सुश्राव्य भजनांने झाली .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg