loader
Breaking News
Breaking News
Foto

डिचोली येथे उघडया जीपमध्ये माटणे येथील महिलेचा मृतदेह, परिसरात खळबळ

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील माटणे तळेवाडी येथील महिला लक्ष्मी भिको शिरोडकर, वय वर्षे ५५ हिचा मृतदेह संशयास्पद उघडया जीपमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एकंदर हा खुनाचा प्रकार असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर दोडामार्ग तालुक्यातील माटणे गावात देखील खळबळ उडाली आहे. डिचोली पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, बंदरवाडा डिचोली येथील मार्केटच्या बाजूलाच असलेला इमारतीच्या खाली पार्क करून ठेवलेल्या उघड्या जीपमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली असून तिच्या नाकावर जखम असल्याने खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी डिचोली पोलीस निरीक्षक विजय राणे व टीम यासंदर्भात तपासात गुंतलेली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, सदर महिला या परिसरात फिरायची व या ठिकाणी रात्री झोपायची. काल तिचे एका व्यक्तीसोबत भांडण झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी माहिती मिळताच ठाण्याचे उपअधीक्षक श्रीदेवी यांनी तसेच निरीक्षक विजय राणे टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी पंचनामा केला असून फॉरेन्सिक टीम या ठिकाणी तपास करून गेली. सदर मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त होत असल्याने त्या दृष्टीनेही पोलीसांनी तपासाला गती दिली आहे. पोलिसांनी संशयावरून एका इसमास ताब्यात घेतले असून या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg