loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थी करिअर मार्गदर्शन शिबीर ही उद्याच्या क्रांतीची नांदी -महेंद्र टिंगरे

कुणबी समाज म्हसळा(मुंबई)सलग्न, युवक मंडळ, महिला मंडळ, अध्यक्ष महेंद्र टिंगरे यांच्या अध्यक्षतेखाली सरचिटणीस राजु धाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली ता.सह पदधिकारी यांच्या सहकार्याने विद्यार्थी करिअर मार्गदर्शन शिबीर व शाखेचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न झाला. त्या वेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक महत्त्वाच्या पावलानंतर दहावी बारावी नंतर नेमके कोणत्या दिशेला जावे? याकरिता हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. दरवर्षी कुणबी समाज विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांच्या जीवनातील क्रांती घडवण्याचे काम हा समाज सातत्याने करत आहे. त्याचबरोबर या निमित्ताने सालाबाद प्रमाणे समाजाची दिनदर्शिका छपाई करून प्रत्येकाच्या घराघरात ही दिनदर्शिका पोहोचावी या उदात्त हेतूने दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील या निमित्ताने करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवर यांनी समाज उपयोगी उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच हा प्रकाशन सोहळा झाल्यावर विध्यार्थी वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापक सूरज जाधव सर आमंत्रीत केले होते. यामध्ये खुप विध्यार्थ्यांनी सहभागी होऊन मार्गदर्शक घेतले. म्हसळा तालुक्यातील कुणबी समाजातील आपले विद्यार्थी प्रगतीशील, मोठे उद्योजक व्हावी, यासाठी शिक्षण घेत असताना प्रगती व्हावी या करता करिअर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहचिटणीस मनोज मोरे यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्थावना ता. सरचिटणीस राजु धाडवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न व्हावे याकरता सर्व सलग्न मंडळ यांनी नियोजन केले. सालाबादप्रमाणे तालूक्याला समाजसेवा करणारे म्हणजे प्रायोजक यांचे सत्कार व फुलगुच्छा भेटवस्तु देण्यात आले.

टाइम्स स्पेशल

करिअर मार्गदर्शनसाठी आलेले विद्यार्थी यांना तालुक्याच्या वतीने भेटवस्तु म्हणून गणपती. मेटल पेन देण्यात आले. पुढील काळात समाज आपल्या सोबत असेल पण पुढे जाऊन समाजाप्रति आपुलकी निर्माण करून एक नजर समाजाच्या कार्याकडे असावी असे आव्हान समाज अध्यक्ष महेंद्र टिंगरे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg