loader
Breaking News
Breaking News
Foto

नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या ‘गंधार महोत्सव २०२५-२६’ चा दिमाखदार सोहळा

संगमेश्वर (प्रतिनिधी): नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि क्रीडा महोत्सव असलेला ‘गंधार महोत्सव २०२५-२६’ नुकताच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या महोत्सवात ऐश्वर्या मेस्त्री हिने 'स्टुडन्ट ऑफ द इयर'चा बहुमान पटकावला, तर हॉटेल मॅनेजमेंट (HM) विभागाने 'चॅम्पियन क्लास' चषकावर आपले नाव कोरले. महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ संस्थेचे चेअरमन माननीय अभिजित हेगशेट्ये आणि फिशरी कॉलेजचे प्राचार्य डॉ केतन चौधरी, सरपंच ऋतुजा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्य संजना चव्हाण, किरण गुरव स्थानिक समितीचे सदस्य उदय संसारे, दिलीप रहाटे, विनोद मुळ्ये, संदेश कापडी, महंमद दसुरकर, दिलीप म्हैसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना चेअरमन अभिजित हेगशेट्ये म्हणाले, "गंधार महोत्सव हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि आत्मविश्वासाचा मंच आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संस्था असे उपक्रम सातत्याने राबवत राहील." प्राचार्य डॉ केतन चौधरी यांनीही विद्यार्थ्यांना शैक्षणिक यशासोबतच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राचे महत्त्व पटवून दिले. तसेच सरपंच ऋतुजा कदम यांनी मार्गदर्शन केले. क्रीडा स्पर्धांचे सविस्तर निकाल या महोत्सवात विविध सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी चुरशीची लढत दिली: खेळ विजेता उपविजेता खो-खो (मुली) रायगड ज्युनिअर मुली / एच.एम, कबड्डी (मुले) रायगड एच.एम, कबड्डी (मुली) रायगड एच.एम, व्हॉलीबॉल (मुले) एच.एम.-१ रायगड, क्रिकेट (मुले) एच.एम.-१ गणपती बाप्पा मोरया, बुद्धिबळ (मुले) अनिकेत मेश्राम सोहम नलावडे, कॅरम व बॅडमिंटन गाजवणारे खेळाडू: कॅरम (एकेरी): पूजा मेस्त्री (मुली) आणि प्रथमेश जोगळे (मुले) विजयी. बॅडमिंटन (एकेरी): ऐश्वर्या मेस्त्री (मुली) आणि नीरज खातू व सम्यक पवार (मुले) विजयी.

टाइम्स स्पेशल

मिस गंधार २०२६: सौंदर्याचा आणि बुद्धिमत्तेचा आविष्कार महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेल्या 'मिस गंधार' स्पर्धेत विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले: मिस गंधार : सलोनी ओकटे प्रथम उपविजेती : मुक्ता शिंदे बेस्ट स्माईल : वैष्णवी खांबे बेस्ट वॉक : ऋतुजा निवळकर बेस्ट कॉस्ट्यूम : सलोनी ओकटे या यशस्वी आयोजनामुळे महाविद्यालयात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. महोत्सवाच्या यशासाठी महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष खरे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

ऐश्वर्या मेस्त्री ठरली स्टुडन्ट ऑफ द इयर

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg