loader
Breaking News
Breaking News
Foto

तळे जांभुळवाडी शाळेत डिजिटल साहित्य वितरण

खेड - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तळे जांभुळवाडी, तालुका खेड येथे दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी डिजिटल साहित्य वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. किंजळे ता.खेड गावचे दानशूर व्यक्तिमत्त्व शाहीर शंकरदादा सखाराम गायकवाड यांच्या सौजन्याने शाळेसाठी ब्लूटूथ विथ माईक स्पीकरचे वितरण करण्यात आले. या डिजिटल साहित्यामुळे विद्यार्थ्यांना कविता गायन, भाषण, विविध गाणी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी मोठा उपयोग होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाहीर शंकरदादा गायकवाड यांनी यापूर्वीही शाळेस टीव्ही व इतर शैक्षणिक साहित्य देऊन मोलाचे सहकार्य केलेले आहे. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक प्रगती साधावी व उच्च पदावर जावे, यासाठी त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. तसेच, “मुलांना ज्या-ज्या शैक्षणिक कमतरता जाणवतील, त्या दूर करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकेश महादे, शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र इटकर, शिक्षक निलेश कांदेकर, शाळेचे माजी विद्यार्थी शैलेश खापरे, अक्षय लोलम, ओंकार शिर्के, बाळू शिर्के तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg