loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरूखमध्ये विवाहितेचा बाथरूमध्ये जळालेला मृतदेह आढळला

देवरूख (वार्ताहर) - संगमेश्वर तालुक्यातील देवरुख वरचीआळी येथे एका ३० वर्षीय विवाहितेचा घराबाहेरील बाथरूममध्ये जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अक्षरा अरविंद मोहिते असे मृत विवाहितेचे नाव असल्याचे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आलेल्या अधिक माहितीनुसार, अक्षरा मोहिते या नेहमीप्रमाणे जेवण करून घरात झोपल्या होत्या. पहाटे त्यांचा ७ वर्षांचा मुलगा आलोक याला जाग आली. त्यावेळी त्याला आई बिछान्यावर दिसली नाही. मुलाने घरातच राहणार्‍या वडिलांच्या मावशी ताराबाई शिंदे यांना उठवले. ताराबाई आणि आलोक यांनी घरात शोधाशोध केली, मात्र अक्षरा मिळून आल्या नाहीत. घाबरलेल्या मुलाने आणि ताराबाई यांनी शेजारी राहणारे काका दत्ताराम तुकाराम मोहिते यांना उठवून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर सर्वांनी मिळून पुन्हा शोध घेतला असता, घराबाहेरील बाथरूममध्ये अक्षरा या भाजलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

टाइम्स स्पेशल

नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी घटनेची माहिती तात्काळ देवरुख पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्धवट जळालेल्या अवस्थेतील अक्षरा यांना तात्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg