loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज : आयुक्त सौरभ राव

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025-26 येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असून निवडणुकीसाठी ठाणे महापालिकेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून शांततापूर्ण वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांनी दिली. निवडणूकीचा कार्यक्रम हा लोकशाहीचा उत्सव असून या उत्सवात सर्वांनी सहभागी होवून जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, मिताली संचेती, दीपक झिंजाड आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून 23 ते 29 डिसेंबर, 2025 (सकाळी 11 ते दुपारी 3) .30 डिसेंबर, 2025 (सकाळी 11 ते दुपारी 2) या कालावधीत नामनिर्देशन अर्जाचे वाटप व दाखल करता येणार आहे.‍ 31 डिसेंबर 2025 रोजी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक 2 जानेवारी 2026 असून 3 जानेवारी 2026 रोजी निवडणूक चिन्ह नेमूनदिले जाणार आहे. अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 03 जानेवारी रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल व त्यानंतर 19 जानेवारी 2026 रोजी निवडून आलेल्या उमेदवारांची यादी राजपत्रात प्रसिध्द केली जाणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

टाइम्स स्पेशल

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण प्रभाग 33 असून सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 18 लाख 41 हजार 488 इतकी आहे. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला प्रभाग क्र. 25 असून लोकसंख्या - 62 हजार 697 इतकी तर सर्वात कमी लोकसंख्या असलेला प्रभाग क्र. 29 असून लोकसंख्या - 38 हजार 172 इतकी आहे. एकूण मतदारांची संख्या 16 लाख 49 हजार 867 इतकी असून पुरूष मतदारांची संख्या 8 लाख 63 हजार 878 महिला मतदारांची संख्या - 7 लाख 85 हजार 830 व इतर मतदारांची संख्या - 159 आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg