loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये सहकाराच्या मंचावर महिलांचा जल्लोष

खेड -सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेड व खेड तालुका सहकारी पतसंस्था संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला संचालक व महिला कर्मचारी यांच्यासाठी सहकार विषयक मार्गदर्शन, विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेड अनिता बटवाल यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून कोकण पतसंस्था फेडरेशनचे संचालक संदीप तांबे, खेड तालुका सहकारी पतसंस्था संघाचे अध्यक्ष वसंत पिंपळकर, सहकारी अधिकारी भगवान आखाडे, अभिनय महाजन, संदीप मोदी, वंदना चिकणी, शामल क्षीरसागर, रमाकांत पाटील, बाबासाहेब गीते, संदीप मोडक व महादेव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड तालुक्यात प्रथमच सहकार क्षेत्रातील महिला संचालक व कर्मचारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंद लुटला. यावेळी सहकार क्षेत्रातील कर्मचारीही उत्स्फूर्तपणे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी झाले होते. “एकमेकांस साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” या उक्तीप्रमाणे एकत्र राहून सहकाराच्या माध्यमातून सहकार्याची ज्योत सदैव धगधगत ठेवू, असा विश्वास यावेळी उपस्थित सर्वांनी व्यक्त केला. या कार्यक्रमामुळे सहकार क्षेत्रातील महिलांचा आत्मविश्वास वाढीस लागल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg