loader
Breaking News
Breaking News
Foto

केशवराव भोसले यांचे आत्मचरित्र तरुणांसाठी दीपस्तंभ ठरेल – आ. भाई जगताप

मुंबई (प्रतिनिधी): केशवराव भोसले हे केवळ बोलणारे नव्हते, तर जसे विचार तसे आचरण करणारे नेतृत्व होते. कुणाला काय वाटेल याचा विचार न करता त्यांनी आयुष्यभर निर्भीड भूमिका घेतली. म्हणूनच ते केशवराव भोसले म्हणून ओळखले गेले, असे प्रतिपादन आमदार भाई जगताप यांनी केले. केशवराव भोसले यांचे आत्मचरित्र प्रत्येक तरुणाने वाचावे; त्यातून नवी दिशा, प्रेरणा आणि मूल्यांची शिदोरी मिळेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. खेड तालुका मराठा सेवा संघाच्या वर्धापनदिनानिमित्त तसेच स्व. केशवराव भोसले यांच्या आत्मचरित्राच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त दादर येथील शिवाजी मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला खासदार अरविंद सावंत, आमदार भाई जगताप, आमदार सुनील शिंदे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप, समन्वयक विरेंद्र पवार, कोंकण पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष विक्रांत आंब्रे, संतोष आंब्रे, सरचिटणीस विश्वास शिंदे, यशवंत कदम, प्रभाकर पालांडे, महिला आघाडी अध्यक्षा ज्योती भोसले, युवा आघाडी अध्यक्ष ॲड. प्रविण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा संघाच्या अध्यक्षा आशा केशवराव भोसले होत्या. यावेळी केशवराव भोसले यांचे आत्मचरित्र तसेच ‘स्मृतीगंध’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

भाषणात पुढे बोलताना आ. भाई जगताप म्हणाले की, केशवराव भोसले खेड तालुका मराठा सेवा संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, म्हणूनच ही संस्था आजही सातत्याने कार्यरत आहे. केशवरावांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. जसे मुंबईचे राजकारण देशात वेगळे आहे, तसेच दक्षिण मुंबईचे राजकारणही स्वतंत्र ओळख राखणारे आहे. अशा कठीण राजकीय परिस्थितीत एका मराठ्याने – केशवराव भोसले यांनी – ठसा उमटवणारे काम केले, हे विसरता येणार नाही, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे व दिलीप जगताप यांनीही समयोचित भाषणे केली. जवळपास सर्व वक्त्यांनी केशवराव भोसले यांच्या कन्या स्व. दुर्गा हिचा आवर्जून उल्लेख केला. तसेच नातू राहुल सावंत यांनी मनोगत व्यक्त करत सेवा संघाचे कार्य अधिक व्यापक व गतिमान करण्याचा संकल्प जाहीर केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg