loader
Breaking News
Breaking News
Foto

वेळ आल्यास सर्व व्हिडिओ बाहेर काढू.. मुख्यमंत्र्यांच्या ‘अल्ला हाफिज’ वरून राज ठाकरेंचा फडणवीसांना थेट इशारा

मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘अल्ला हाफिज’ म्हणतानाचा जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट फडणवीस यांना इशारा दिला आहे. “वेळ आल्यास सर्व व्हिडिओ बाहेर काढले जातील,” असा स्पष्ट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत युतीची घोषणा करत असताना हा मुद्दा उपस्थित केला. आजकाल कोणाचा कोणता व्हिडिओ कधी बाहेर येईल, याचा नेम नाही. राजकारणात निवडक व्हिडिओ दाखवून वातावरण तापवण्याचा प्रकार सुरू आहे. पण सगळ्यांकडेच भूतकाळ आहे. वेळ आली, तर प्रत्येकाचे व्हिडिओ बाहेर येऊ शकतात, असा सूचक इशारा राज ठाकरे यांनी दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुख्यमंत्री फडणवीस यांचा काही वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात ते ‘अल्ला हाफिज’ असे म्हणताना दिसतात. हा व्हिडिओ काही संघटनांकडून आणि सोशल मीडिया अकाउंट्सवरून शेअर केला जात असून, त्यावरून राजकीय टीका सुरू झाली आहे. काही जण हा व्हिडिओ धार्मिक भावनांशी जोडत प्रश्न उपस्थित करत आहेत.राज ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना दुटप्पी राजकारणावर बोट ठेवले. एकीकडे सत्ताधारी लोक भाषणांत मोठमोठ्या गोष्टी करतात आणि दुसरीकडे जुन्या व्हिडिओंवरून राजकारण खेळतात. हे बंद व्हायला हवं. अन्यथा या खेळात सगळेच उघडे पडतील, असेही राज ठाकरे म्हणाले. निवडणुका जवळ आल्या की अशा गोष्टी मुद्दाम पुढे आणल्या जातात. महाराष्ट्रात बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत; पण चर्चा मात्र व्हिडिओंची, अशी टीका ठाकरे यांनी केली.

टाइम्स स्पेशल

राज ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना दुटप्पी राजकारणावर बोट ठेवले. एकीकडे सत्ताधारी लोक भाषणांत मोठमोठ्या गोष्टी करतात आणि दुसरीकडे जुन्या व्हिडिओंवरून राजकारण खेळतात. हे बंद व्हायला हवं. अन्यथा या खेळात सगळेच उघडे पडतील, असेही राज ठाकरे म्हणाले. निवडणुका जवळ आल्या की अशा गोष्टी मुद्दाम पुढे आणल्या जातात. महाराष्ट्रात बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत; पण चर्चा मात्र व्हिडिओंची, अशी टीका ठाकरे यांनी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg