loader
Breaking News
Breaking News
Foto

पर्यटन हंगाम सुरू असतानाच रस्ते खोदाईमुळे आंजर्लेत धुळीच्या त्रासाने सर्वच हैराण

दापोली (प्रतिनिधी) - दरवर्षी प्रमाणे यावर्षीही डिसेंबर महिन्यात पर्यटन व्यवसायाचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात आंजर्ले येथे दाखल होत आहेत. दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढतच चालली आहे असे असताना दुसरीकडे मात्र या ना त्या कारणाने रस्ते खोदून ठेवल्याने धुळीचे साम्राज्य तयार झाले असून या धुळीच्या पसरण्याने सर्वानाच त्रास होऊ लागला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील आंजर्ले हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे गाव आहे. अशा या आंजर्ले गावात मागील काही दिवसांपासून विदयुत महावितरण कंपनीने भुमीगत विदयुत लाईन टाकण्याचे काम ठेकेदारामार्फत सुरू केले आहे. ठेकेदाराने खोदकाम केलेल्या भागावर दगडाने सॉलिग करून त्यावर रोड रोलरने दबाइ करून रस्ता पुरवत करावा, असे अटी वर रस्ता खोदकाम करण्यासाठी बांधकाम विभागाने परवानगी दिली असताना मुजोर ठेकेदाराने भुमिगत विदयुत लाईन टाकून झाल्यावर जेसीबी च्या सहायाने त्या वर नुसतीच माती ओढून घेतली आहे. सद्यस्थितीत पर्यटन हंगाम जोरदारपणे सुरू झाला असल्याने आणि खोदलेल्या रस्त्यावर नुसतीच माती ओढून ठेवल्याने रस्त्यावर प्रचंड प्रमाणात माती आली आहे.

टाइम्स स्पेशल

रस्त्यावरील सतत ये जा करणाऱ्या वाहनांच्या वाहतूकीने मातीची धूळ सगळीकडे उडत असून याचा त्रास आंजर्ले गावातील उभागर, कोपरी मुर्डी या भागातील नागरिकांना व येथे येणाऱ्या पर्यटकांना होत आहे. रस्त्याची मालकी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर ठोस उपाययोजना करावी अशाप्रकारची मागणी होत आहे. कारण या प्रकारामुळे स्थानिक आंजर्ले येथील रहिवाशांच्या च्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून खोकला व श्वसनाचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन योग्य ती उपाय योजना करावी. अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg