loader
Breaking News
Breaking News
Foto

कोल्हापूर-दोडामार्ग-पणजी एसटी बस पुन्हा सुरू, प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन

दोडामार्ग (प्रतिनिधी) - गेल्या काही महिन्यापासून बंद असलेली कोल्हापूर ते गडहिंग्लज, चंदगड, तिलारी, दोडामार्ग, पणजी एसटी बस पुन्हा प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आली आहे. तेव्हा जवळच्या मार्गाने पणजी येथे जाणाऱ्या या बसचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर, विभाग नियंत्रण तसेच कागल यांनी केले आहे. कोल्हापूर येथून सकाळी सहा वाजता ही बस सुटणार आहे. पणजी येथून पुन्हा माघारी येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या अनेक वर्षांपासून तिलारी घाट मार्गे सुरू असलेली कागल आगाराची कोल्हापूर पणजी बस बस संख्या अपुरी व इतर काही समस्या यामुळे बंद होती. या मार्गावर कागल डेपोची एकच बस सुरू होती. बंद असलेली बस सुरू करावी अशी मागणी प्रवाशी करत होते. कोल्हापूर, गडहिंग्लज, चंदगड, मधिल अनेक सरकारी नोकरी निमित्त असणारे कर्मचारी यांना या बसेस सोयीस्कर ठरतात. कामे करून पुन्हा संध्याकाळी जाणे शक्य होते. विद्यार्थी वर्ग यांची सोय झाली होती. शिवाय कोल्हापूर येथून सकाळी जवळच्या मार्गाने तिलारी घाट मार्गे पणजी येथे जाणारी पहिली बस यामुळे अनेक जण या बस मधून प्रवास करत होते. प्रवासी सरकारी कर्मचारी, विद्यार्थी यांच्या सोयीसाठी कागल आगाराची कोल्हापूर ते पणजी व्हावा चंदगड तिलारी घाट दोडामार्ग मार्गे पणजी बस रविवारी सुरू करण्यात आली आहे. तेव्हा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूर विभाग नियंत्रण तसेच कागल आगार व्यवस्थापक यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg