loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतात ख्रिसमसला झालेल्या तोडफोडीच्या घटनांची आंतररराष्ट्रीय माध्यमांनी घेतली 'अशी' दखल

भारतात अनेक ठिकाणी ख्रिसमसचा उत्सव साजरा करणाऱ्या लोकांबरोबर जबरदस्ती झाल्याच्या आणि हल्ला झाल्याच्या बातम्या समोर आल्या. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि केरळसह अनेक ठिकाणांहून अशा बातम्या आल्या. या घटनांची चर्चा भारतातील प्रसारमाध्यमांमध्ये तर झालीच, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी देखील याची दखल घेतली. अनेक जाणकार आणि मानवाधिकार संघटनांनी या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर भारतात 'ख्रिश्चन समुदायाला असणाऱ्या धोक्या' संदर्भात त्यांनी भारत सरकारकडे सुरक्षा पुरवण्याचीदेखील मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ख्रिसमसच्या सणानिमित्त 25 डिसेंबरच्या सकाळी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या होत्या. तसंच ते सकाळी दिल्लीतील एका चर्चमध्ये गेले होते. अनेक आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी मोदींच्या चर्चला भेट देण्यासोबतच या हल्ल्यांच्या बातम्याही प्रामुख्यानं दाखवल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतात ख्रिसमस मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला. मात्र त्याचबरोबर अनेक ठिकाणी ख्रिसमस साजरा करत असलेल्या लोकांवर हल्ला झाल्याच्या आणि अनेक ठिकाणी तोडफोड झाल्याच्या बातम्या आल्या. बीबीसीचे सहयोगी आलोक पुतुल यांच्या मते, छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी ख्रिसमसला विरोध करत अनेक ठिकाणी तोडफोड केली. यात आरोप करण्यात आला आहे की, बुधवारी (24 डिसेंबर) रायपूरमधील मॅग्नेटो मॉलमधील कर्मचाऱ्यांना त्यांची जात आणि धर्म विचारून धमकावण्यात आलं. तसंच तोडफोड करण्यात आली. मॅग्नेटो मॉलच्या मार्केटिंग विभाग प्रमुख आभा गुप्ता यांच्यानुसार, "मोठ्या संख्येनं लोक लाठ्या आणि हॉकी स्टिक घेऊन मॉलमध्ये शिरले. मग त्यांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. ते कर्मचाऱ्यांची ओळखपत्र पाहात होते आणि विचारत होते की, तुम्ही हिंदू आहात की ख्रिश्चन." ख्रिसमसनिमित्त मॉलमध्ये सजावट करण्यात आली होती. हिंदुत्ववादी संघटनांच्या जमावानं त्या सजावटीची देखील पूर्ण तोडफोड केली. आभा गुप्ता यांच्यानुसार किमान 15 ते 20 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.

टाईम्स स्पेशल

इतर अनेक ठिकाणीदेखील दुकानदारांना मारहाण केल्याच्या आणि तोडफोड केल्याच्या बातम्या आल्या आहेत.मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये देखील काही ठिकाणी ख्रिश्चन धर्मियांच्या प्रार्थना सभा आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये मारहाण केल्याच्या आणि गोंधळ केल्याच्या घटनांच्या बातम्या आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg