loader
Breaking News
Breaking News
Foto

बांबर्डेत ‘ओमकार’ हत्तीकडून शेतीचे नुकसान; वनविभागाच्या दुर्लक्षा विरोधात शेतकऱ्यांचा तीव्र संताप

तिलारी (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे गावात जंगली ‘ओमकार’ हत्तीने पुन्हा एकदा दहशत निर्माण केली असून, शेतकऱ्यांचे जगणे अक्षरशः असह्य झाले आहे. बांबर्डे येथील शेतकरी ऋषभ देसाई यांच्या शेतात घुसखोरी करून या हत्तीने केवळ उभी पिकेच नष्ट केली नाहीत, तर शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या महागड्या पावर टिलरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या घटनेमुळे परिसरात वनविभागाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बांबर्डे, हेवाळे आणि घाटिवडे परिसरात मागील २२ वर्षांपासून हत्तींचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेक वेळा उपोषणे, आंदोलने केली आणि प्रशासनाला निवेदने दिली. मात्र, वनविभाग व शासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकरी करत आहेत. शासनाकडून आजपर्यंत कोणतीही ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना न करण्यात आल्याने ही अवस्था शासनाच्या निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण बनली आहे.

टाईम्स स्पेशल

हत्तींच्या सततच्या हल्ल्यांमुळे शेती उद्ध्वस्त होत असून शेतकरी आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकटात सापडला आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, शेतकऱ्यांसमोर “आता जगण्याचा मार्गच उरलेला नाही,” अशी हताश परिस्थिती निर्माण झाली आहे. ऋषभ देसाई यांचे झालेले नुकसान हे याचेच एक ज्वलंत उदाहरण आहे. "शेतकऱ्यांच्या पिकांची आणि नुकसानीची जबाबदारी आता वनविभागाने प्रत्यक्ष घ्यावी. व ताबडतोब हत्ती पकड मोहीम राबवावी, जर शासनाने यावर तातडीने पावले उचलली नाहीत, तर आम्हाला वनविभागाविरोधात मोठा जनाक्रोश उभा करावा लागेल. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका."असा इशारा दत्ताराम देसाई यानी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg