loader
Breaking News
Breaking News
Foto

ट्रॅक्टरच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू, चालक फरार; मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा

संगलट (खेड)( प्रतिनिधी) - आंबडवे ते मंडणगड मार्गावरील जांभळीची मळी परिसरात ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली असून, अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात संबंधित ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रमेश गंगाराम गोरे (वय ३५, रा. घोसाळे धनगरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे २.५९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. आरोपी सुभाष लिंबाजी जाधव (रा. समर्थनगर, भिंगळोली) हा आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच. ४६/ए/१०८५) अतिवेगाने, निष्काळजी व बेदरकारपणे चालवत होता. रस्त्यावर कोणताही अडथळा नसतानाही परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने फिर्यादींचे चुलत भाऊ प्रकाश पांडुरंग गोरे (वय ३५, रा. घोसाळे धनगरवाडी) यांना जोराची धडक दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या धडकेत प्रकाश गोरे यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. मात्र, अपघातानंतर मदत न करता आरोपी ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७४/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम १०६(२), १२५(अ), १२५(ड), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg