loader
Breaking News
Breaking News
Foto

मडुरा हायस्कूलची विविध स्पर्धेत विजयी घोडदौड

बांदा (प्रतिनिधी) - बांदा येथे पार पडलेल्या डॉ. व्ही. के. तोरसकर क्रीडा स्पर्धा व पं. नेहरू स्मृती वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कुल मडुराच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून विजयी घोडदौड कायम ठेवलीआहे. मराठी विभाग मध्ये निधी कृष्णा किडजी (8वी ) उत्कृष्ठ वक्तृत्व शैलीसह प्रथम क्रमांक पटकवला. लहान गटात आस्था रघुनाथ वेंगुर्लेकर प्रथम क्रमांक. तर मानसी सुभाष परब हिंदी वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ समाधान मानावं लागलं. डॉ. व्ही. के. तोरसकर व डॉ. आशाताई तोरसकर क्रीडा स्पर्धा मध्ये 14 वर्षे वयोगट मुलगे कु. देवेश गोपाळ नाईक (इ 8 वी) गोळाफेक प्रथम क्रमांक तर 100 मीटर धावणे, लांब उडी द्वितीय क्रमांक, सुनील प्रशांत मेस्त्री (8वी) थाळीफेक प्रथम क्रमांक तर मुलींच्या गटात हर्षदा संजय नाईक (8वी)गोळाफेक प्रथम, अलिशा राघोबा गावडे (8 वी ) थाळीफेक प्रथम क्रमांक, लांब उडी द्वितीय क्रमांक.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

17 वर्षे वयोगट मुलगे मंगेश नितीन नाईक (10वी ) गोळाफेक प्रथम, सहदेव लक्ष्मण पाडलोसकर (9वी ) थाळी फेक प्रथम, भालाफेक तृतीय. तर मुलींमधून उर्वशी विजय शेर्लेकर (9वी ) थाळी फेक प्रथम, काजल गोविंद माधव (9वी ) 100 मी. धावणे प्रथम, लांब उडी द्वितीय, क्लेरिसा ज्यूलिअस रॉड्रिंक्स (9वी ) गोळाफेक द्वितीय क्रमांक प्राप्त केला. स्व. आबासाहेब तोरसकर हँडबॉल स्पर्धेत उपविजेते पद मिळवून सलग 11 वर्षे ट्रॉफी टिकवून ठेवण्यात यश मिळाले आहे. खेळाडूंना क्रीडा शिक्षक महेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले तर वक्तृत्व स्पर्धेसाठी भाषा विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वांचे धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई च्या अध्यक्षा कल्पना तोरसकर , कार्याध्यक्ष डॉ. मिलिंदजी तोरसकर व पदाधिकारी, समन्वय समिती सचिव रश्मी तोरसकर, समन्वय समिती सहसचिव प्राचार्य नंदकुमार नाईक, मुख्याध्यापिका सायली परब, शालेय समिती सदस्य, समन्वय समिती सदस्य, पालक शिक्षक संघ, पंचक्रोशीतील सरपंच, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg