loader
Breaking News
Breaking News
Foto

कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपाचा स्वबळावर लढण्याचा नारा

ठाणे (प्रतिनिधी) - दिवसेदिवस कल्याण डोंबिवलीतील भाजपची ताकद वाढली आहे. भाजपाने १२२ पैकी ८३ हून अधिक जागा भाजपसाठी सोडण्याची तयारी आणि पाच वर्ष भाजपकडेच महापौरपद सोडण्याची मागणी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने पूर्ण केली तरच पालिकेत शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती शक्य आहे. अन्यथा, आमचा मार्ग मोकळा आहे, अशा स्पष्ट शब्दात भाजपचे कल्याणचे माजी आमदार आणि महायुती समन्वय समिती सदस्य नरेंद्र पवार यांंनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधण्यास स्पष्ट केल्याने मांडली. नवी मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवलीत भाजपचा स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता आहे. सेना भाजपा युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या मतांंवर घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले आहे. दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या मताचा आदर शिवसेना, भाजप नेत्यांनी केला पाहिजे आणि आपला शब्द पाळला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, असे नरेंद्र पवार यांनी सांगितले. भाजपने कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा पक्का केला आहे. स्वबळावरच पालिका निवडणूक लढवू या विषयी भाजप कार्यकर्ते यांनी पक्षश्रेष्ठीकडे मागणी केली आहे.

टाइम्स स्पेशल

शिवसेनेचे जागा वाटपाचे गणिती सूत्र आम्हाला अजिबात मान्य नाही. भाजपने तयार केलेला जागा वाटपाचे गणित आताच्या राजकीय परिस्थितीवर आहे. शिवसेनेने ते मान्य करावे. तसे नसेल तर भाजपचा मार्ग पूर्ण मोकळा असेल, असे पवार यांनी स्पष्ट केले. यामुळे कल्याण डोंबिवलीत भाजपा-सेना युतीत जवळ जवळ बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg