loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त दापोली न्यायालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

दापोली (प्रतिनिधी) -: राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून दापोली न्यायालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात दापोलीतील सुप्रसिद्ध विधिज्ञ व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या दापोली तालुका अध्यक्षा ॲड. मनीषा जोशी यांनी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मधील तरतुदी, ग्राहकांचे हक्क व अधिकार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्राहकांची फसवणूक, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया, ऑनलाईन खरेदीतील हक्क तसेच सेवा पुरवठ्यातील त्रुटींविरोधात उपलब्ध कायदेशीर उपाय यांची माहिती देत नागरिकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहावे असे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कायदे विषयक मार्गदर्शन शिबिराच्या आयोजित या कार्यक्रमाला दापोली न्यायालयाचे न्यायाधीश आर. ए. नेमाडे, पी. एस. वारके, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कमलेश मुसलोणकर, मनोहर जैन, विधी सेवा समिती सदस्य मनोज पवार, अ‍ॅड. आदिती भिडे यांच्यासह वकीलवर्ग व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामान्य नागरिकांमध्ये ग्राहक हक्कांविषयी जनजागृती करणे हा या शिबिराचा उद्देश असल्याचे यावेळी विधी सेवा समिती सदस्य मनोज पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg