loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हाध्यक्षांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा - जलाल भाई राजपुरकर

खेड (प्रतिनिधी) - नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रत्नागिरी जिल्ह्यात नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते जलाल भाई राजपुरकर यांनी पक्षाच्या संघटनात्मक अपयशावर तीव्र टीका करत जिल्हाध्यक्षांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी केली आहे. खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना राजपुरकर म्हणाले की, संपूर्ण जिल्ह्यात पक्ष दोन आकडी जागांपर्यंतही पोहोचू शकलेला नाही, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आलेख सतत घसरत असून यामागे संघटनात्मक दुर्लक्ष कारणीभूत आहे. लोकसभा निवडणुकीतही गुहागर आणि दापोली विधानसभा मतदारसंघात खासदार सुनील तटकरे यांना सुमारे ३५ हजार मतांचे नुकसान सहन करावे लागले होते, तरीही संघटना मजबूत करण्यासाठी आवश्यक पावले उचलली गेली नाहीत, असे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड नगरपरिषद निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान न मिळाल्याबाबत बोलताना त्यांनी आरोप केला की, केंद्रात व राज्यात महायुती सत्तेत असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला विश्वासात घेतले गेले नाही. संघटनात्मक कमतरतेमुळेच आमचे अस्तित्वच नसल्यासारखे वागवले गेले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. संघटना चालना देणे हे नेतृत्वाचे काम असताना येथे निर्णय एकट्याने घेतले गेले आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना चर्चेत सामावून घेतले गेले नाही, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. ‘एकला चलो रे’ सारख्या पद्धतीमुळे संघटनेत एकजूट राहिली नाही आणि त्याचाच फटका निवडणुकीत बसल्याचे त्यांनी नमूद केले. रायगड जिल्ह्यात पक्षाला काही प्रमाणात यश मिळाले असले तरी रत्नागिरीत अपयश का आले याचे आत्मपरीक्षण होणे गरजेचे असल्याचे सांगत, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत अशी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीने संघटना सक्रिय करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टाइम्स स्पेशल

या सगळ्या अपयशाची नैतिक जबाबदारी जिल्हाध्यक्षांचीच असून त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, हीच पक्षहिताची भूमिका असल्याचे जलाल भाई राजपुरकर यांनी ठामपणे सांगितले. संघटनात्मक दुर्लक्ष थांबवून सर्वांना सोबत घेऊन काम केले तरच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उभारी घेऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg