loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये खाजगी वाहनधारकाचे वाहनतळ, पक्षकाराकडून नाराजी व्यक्त

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) -खेड तहसीलदार कार्यालयाच्या आवरामध्ये वाहनांच्या कोंडीमुळे तहसीलदार कार्यालयामध्ये पक्षकाराने आपल्या कामासाठी येणारे वाहनाच्या अडथल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. सध्या खेडमध्ये वाहने उभे करण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होत असताना याचा फायदा घेत दुचाकी चार चाकी वाहनधारक हे खेड तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये गाड्या पार्किंग करून संपूर्ण बाजार फिरताना दिसत आहे. तसेच तहसीलदार कार्यालयाच्या समोर सब रजिस्टर कार्यालय असल्याने या ठिकाणी येणारे लोक ही तहसीलदार आवरामध्ये आपल्या गाड्या पार्किंग करून ठेवत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र तहसीलदार कार्यालयामध्ये येणाऱ्या लोकांना वाहने पार्किंग करण्यासाठी जागा मिळत नसल्याने संतापाची लाट पसरली आहे. मात्र त्यांना एक एक किलोमीटर दूर वाहने उभे करून तहसीलदार कार्यालयामध्ये कामासाठी पायपीट करून यावा लागत आहे. यामुळे संतापाची लाट पसरली आहे. याबाबत खेड तहसीलदार यांनी आवारामध्ये वाहने उभे करून ठेवणाऱ्या वर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अनेक सामाजिक कार्यकर्त्यातून होत आहे. मात्र हा प्रकार गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. याबाबत खेड तहसीलदार कोणते भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg