loader
Breaking News
Breaking News
Foto

वातावरण तापले! शिंदेंच्या गडात भाजपाची बॅनरबाजी; 16 ठिकाणी लावले “नमो भारत, नमो ठाणे” बॅनर

ठाणे. : ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना एकत्र मैदानात उतरणार असल्या तरी अद्याप जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झालेलं नाही. मात्र, या पार्श्वभूमीवर ठाण्यात भाजपने आक्रमक पवित्रा घेत निवडणूक प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. संपूर्ण ठाणे शहरात जवळपास 16 ठिकाणी भाजपकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली असून “नमो भारत, नमो ठाणे” या ठळक मथळ्याखाली हे बॅनर झळकत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बॅनरबाजीमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापलं असून, भाजपने एक प्रकारे निवडणूक प्रचाराचा नारळ फोडल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. शिवसेनेकडून अद्याप अंतिम प्रस्ताव न आल्याने भाजपने पुढाकार घेत थेट प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर भर देत “नमो भारत, नमो ठाणे” हा संदेश देत भाजपने विकास, राष्ट्रवाद आणि मजबूत नेतृत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला आहे.

टाइम्स स्पेशल

विशेष म्हणजे, जागावाटपाबाबत चर्चा सुरू असतानाही भाजपचा हा आक्रमक प्रचार शिवसेनेसाठी दबाव वाढवणारा ठरत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असला तरी सध्या प्रचाराच्या मैदानात भाजप बाजी मारताना दिसत आहे. शहरातील प्रमुख चौक, वाहतूकदार भाग आणि वर्दळीच्या ठिकाणी लावलेल्या बॅनरमुळे भाजपची उपस्थिती ठळकपणे जाणवत आहे. दुसरीकडे, शिवसेनेकडून अद्याप ठोस प्रचार सुरू झाल्याचं चित्र दिसत नाही. ना मोठी बॅनरबाजी, ना ठळक प्रचार मोहिम – त्यामुळे शिवसेना सध्या प्रचारात उणी ठरत असल्याची चर्चा सुरू आहे. जागावाटपावर अंतिम निर्णय होईपर्यंत शिवसेना ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेत असल्याचं मानलं जात असलं, तरी भाजपच्या आक्रमक हालचालींमुळे सेनेवर लवकर निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg