loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर सरस महोत्सवाला पर्यटकांसह तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वरवेली (गणेश किर्वे) - उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती गुहागर यांच्यावतीने महिला स्वयंसहायता समूह देणगी आयोजित ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांच्या कर्तुत्वाचे व कौशल्याचे आणि उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री याकरिता गुहागर सरस महोत्सव २०२५ चे आयोजन गुरुवारपासून पोलीस परेड ग्राउंड तहसील कार्यालय मागे गुहागर येथे करण्यात आले आहे. या सरस महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, गुहागर नगरपंचायतचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, नायब तहसीलदार विद्याधर वैशंपायन, तालुका अभियान व्यवस्थापक दूर्वा ओक, कक्ष अधिकारी सुनील लोंढे, वरवेली सरपंच नारायण आगरे, तसेच विविध बँकेचे व्यवस्थापक, समुदाय संसाधन व्यक्ती, तसेच बचत गटातील प्रमुख महिला उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सरस महोत्सवामध्ये ग्रामीण भागातून ३५ तर गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील ५ बचत गटांचे विविध स्टॉल मांडण्यात आले होते. सरस महोत्सवामध्ये विविध प्रकारचे पापड-लोणचे, घरगुती मसाले, घरगुती सरबते, ज्वेलरी कपडे, विविध खाद्यपदार्थे, विविध प्रकारची मच्छी, विविध प्रकारचे पीठ, तसेच विविध कोकणी प्रॉडक्ट माफक दरात सर्वांना उपलब्ध करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी नाताळची सुट्टी असल्याने या सरस महोत्सवामध्ये महिला स्वयंसहायता समूहाच्या उत्पादनांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. गुहागर सरस महोत्सव नाताळच्या सुट्टीत आयोजित करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाची विक्री होण्यास मदत होणार आहे. या प्रदर्शनात ग्रामीण भागातील ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांना विविध उत्पन्नाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे या महोत्सवामध्ये स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादन केलेल्या पदार्थांची विक्रमी खरेदी होणार आहे. या गुहागर सरस महोत्सवामध्ये विविध कलात्मक वस्तू, कोकणी मसाले, कोकणी मेवा, कोकणी खाद्य संस्कृती दालन तसेच अस्सल ग्रामीण चवीचे खाद्यपदार्थांची मेजवानी मिळणार आहे. तसेच बचत गटातील महिलांसाठी विविध फनी गेम्स ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सर्व पर्यटकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

या महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या ग्रामीण भागातील स्वयंसहायता बचत गट संमती महिलांचा या सरस महोत्सवातून उत्साह वाढला आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला विक्रीच्या स्वरूपात प्रतिसाद द्यावा, या प्रदर्शनाचा पर्यटकांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेऊन गुहागर तालुक्यातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेले विविध कोकणातील विविध उत्पादने व खाद्यपदार्थांचा सर्वांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे. सर्व उपस्थित स्वयंसहायता बचत गटातील महिलां व नागरिक, पर्यटकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तसेच रेकॉर्ड स्पर्धा जाकडी नृत्य, कोळी नृत्य, नमन व कोकणी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. ग्रामीण महिलांच्या जिद्द, कला आणि चवीचं अप्रतिम दर्शन-गुहागर सरस महोत्सवाच्या माध्यमातून सर्वांना होणार आहे. तरी या सर्व प्रदर्शनाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg