loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीत 'भजन संध्या' उत्साहात; लोकनाथ स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

सावंतवाडी (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन), सावंतवाडीच्या वतीने आयोजित 'भजन संध्या' या दिव्य आध्यात्मिक सोहळ्याला भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. राणी पार्वती देवी हायस्कूलच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी गोवा, बेळगाव, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, निपाणी, मुंबई आणि कोकणातील विविध भागांतून हजारो वैष्णवांनी गर्दी केली होती. ​कार्यक्रमाची सुरुवात मंगलचरणाने झाली. माडखोल हायस्कूलचे सांगेलकर यांनी भक्तीगीते सादर करून वातावरणात चैतन्य निर्माण केले. त्यानंतर इस्कॉन नोएडाचे कीर्तनकार सुबल गोपाल प्रभूजी यांनी 'हरे कृष्ण' महामंत्राचा गजर केला, ज्यावर उपस्थित भक्त मंत्रमुग्ध होऊन डोलू लागले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या सोहळ्याचे मुख्य आकर्षण परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज हे होते. त्यांनी संत तुकाराम महाराजांचा 'सुंदर ते ध्यान' हा अभंग अत्यंत सुश्राव्य स्वरात सादर केला, ज्यामुळे उपस्थित भाविकांमध्ये आनंदाचा संचार झाला. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी भक्तिमय जीवनाचे महत्त्व विषद केले. ​याप्रसंगी अमेरिकेहून आलेले परमपूज्य श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज यांचीही उपस्थिती होती. त्यांनी इंग्रजी भाषेतून भगवद्गीतेचे महात्म्य सांगितले. त्यांच्या हस्ते सावंतवाडी नगरपरिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

​कार्यक्रमात 'संत जनाबाई' यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करण्यात आली, जिने उपस्थितांची मने जिंकली. आध्यात्मिक ग्रंथ प्रसाराचा भाग म्हणून अनेक भाविकांनी भगवद्गीता व इतर ग्रंथांची खरेदी केली. 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अशा भारावलेल्या वातावरणात आणि महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी इस्कॉन पंढरपूरचे सहस्त्रनाम प्रभूजी आणि इस्कॉन सावंतवाडीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg