loader
Breaking News
Breaking News
Foto

पीएमश्री शाळा म्हसळा नं.1 येथे 'राष्ट्रीय शेतकरी दिन' साजरा

म्हसळा (वार्ताहर) - भारतातील शेतकरी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. शेतकऱ्यांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो. भारताचे 5 वे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त देशात 23 डिसेंबर रोजी किसान दिवस साजरा केला जातो.त्या अनुषंगाने म्हसळा तालुक्यातील पीएमश्री शाळा नं 1 येथे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात आला. यासाठी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी वेशभूषा धारण करून शाळेतील परसबागेत स्वतः काम करून प्रत्यक्ष अनुभव घेतला.तसेच या विद्यार्थ्यांनी शेती अवजारांचा उपयोग कसा केला जातो याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.यावेळी शाळेतील शिक्षक श्रीधर उमदी, इंदिरा चौधरी, जयश्री गायकवाड, दीपक मुंडे यांनी विशेष मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg