loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर न.प. निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)ला रोखण्यात सर्वपक्षीय एकजुट

वरवेली (गणेश किर्वे) - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या गुहागर नगरपंचायत निवडणुकीमध्ये एकूण ५ उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणुकीत रिंगणात उभे होते. तर नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून गुहागर नगरपंचायत मध्ये दहा वर्षे नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सुजाता श्रीधर बागकर यांना संधी दिली होती. तसेच ५ नगरसेवक सर्व युवा आणि नवीन उमेदवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिली होती. यामध्ये प्रभाग क्रमांक १ मधून सामाजिक क्षेत्रात ज्यांचे महत्वाचे योगदान असते असे दीपक शिरधनकर, प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्या शीतल कदम, प्रभाग क्रमांक १२ मधून अंन्विता मांडवकर, प्रभाग क्रमांक १४ मधून युवा कार्यकर्ता सौरभ भागडे, प्रभाग क्रमांक १७ मधुन समीक्षा आरेकर असे सुशिक्षित आणि युवा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उभे होते. तसेच गुहागर न.प. निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर लढून सुद्धा २ नंबरचा पक्ष ठरला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त १७ पैकी फक्त नगरसेवक पदाचे फक्त ५ उमेदवार उभे करून मोठी टक्कर भाजप शिवसेना तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कदाचित अजून काही जागांवर उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उभे असते तर अजून मताधिक्य वाढले असते आणि नगराध्यक्ष सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडून आला असता. असेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. फक्त ५ जागेवर उमेदवार उभे करून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस २ नंबरचा पक्ष ठरला आहे. तसेच ५ पैकी ४ नगरसेवक पदासाठी उभे असणारे उमेदवार थोड्या फार फरकानेच पराभूत झालेत आणि अनपेक्षित जागेंवर थोड्या फार फरकाने पराभूत झालेत. त्यामुळे आकडेवारी बघता आणि पराभूत झालेले जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसला आणि विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहिल आरेकर यांना रोखण्यासाठी सर्व पक्षीय एकजुट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दिसून आली असल्याची चर्चा सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

परंतु स्वतंत्र लढून आणि नवीन आणि युवा पिढीला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर शहरातील २ नंबरचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे शहरातील विविध स्तरातील लोकां कडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीची कौतुक होत आहे विशेष करून युवकांना राजकारणात निवडणुकीत संधी देणार या फक्तं अनेकजण घोषणा करतात परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्यक्षात सुशिक्षित युवकांना संधी दिली हे विशेष भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर मध्ये मोठी भरारी घेऊ शकतो असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg