loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग तालुक्यात चोऱ्यांचा सुळसुळाट; व्यापारी संघाने पोलीस प्रशासनाला दिले निवेदन

दोडामार्ग (प्रतिनिधी) : कसई दोडामार्ग शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि चोऱ्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बाजारपेठेतील दुकाने फोडण्याचे प्रकार वाढल्याने व्यापारी आणि सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या गुन्हेगारीला तातडीने आळा घालावा, या मागणीसाठी 'दोडामार्ग व्यापारी संघाने' आज पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन जाब विचारला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

व्यापारी संघाने पोलीस प्रशासनासमोर काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. शहरात बसवण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करून ती कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावी. तसेच, शहरातील मुख्य बाजारपेठ आणि इतर संवेदनशील भागात रात्रीची पोलीस गस्त वाढवण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तालुक्यात येणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांची आणि भाडेकरूंची सखोल चौकशी करून त्यांच्याबाबत कडक धोरण राबवण्यात यावे, जेणेकरून संशयास्पद हालचालींवर नियंत्रण मिळवता येईल, असेही व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष,पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार दोडामार्ग यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg