loader
Breaking News
Breaking News
Foto

तळेखोल गावात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायत वतीने तीन वनराई बंधारे

दोडामार्ग (प्रतिनिधी) - पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त साठा व्हावा, या उद्देशाने ग्रामपंचायत तळेखोल यांच्या वतीने जलसंवर्धनाचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला. अवघ्या एका दिवसात तीन वनराई बंधारे उभारून ग्रामपंचायतीने पाणी साठवणुकीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. या उपक्रमाचे नेतृत्व सरपंच वंदना सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी उपसरपंच महादेव नाईक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य भरत सावंत, गिरीजा दळवी, सुरेखा शेळके, शाम गवस, सिंचल सावंत, उर्मिला गवस उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच कृषी विभागाकडून तालुका कृषी अधिकारी सौरभ कदम, मंडळ कृषी अधिकारी प्रकाश घाडगे, सहाय्यक कृषी अधिकारी दोडामार्ग विवेक सोनवणे, उपकृषी अधिकारी ए. एस. कोळी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या जलसंवर्धन उपक्रमात नारायण सावंत, पंकज गवस, अक्षय सावंत, अनिकेत सावंत, अनिल सावंत, रामचंद्र सावंत, गणपत दळवी, लता नाईक, राधिका सावंत, अंबिका दळवी, दीक्षा गवस, पार्वती गवस, रेणुका नाईक, मनीष सावंत, ऋषी सावंत यांच्यासह इतर ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

टाईम्स स्पेशल

गावातील ओढे व नैसर्गिक जलप्रवाहांवर उभारण्यात आलेल्या या वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवले जाणार असून, त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. शेतकरी, जनावरे तसेच ग्रामस्थांना याचा दीर्घकालीन लाभ होणार आहे. लोकसहभागातून राबविण्यात आलेला हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरणारा असून, भविष्यातही जलसंवर्धन व पर्यावरण रक्षणासाठी असेच उपक्रम राबविण्याचा मानस ग्रामपंचायत तळेखोलने व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg