loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा सचिव पदावर जितेंद्र महाडिक यांची निवड

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा सचिव पदावर जितेंद्र महाडिक यांची वर्णी लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निष्ठावान आणि कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणार्‍या जितेंद्र महाडिक यांना आज पक्षाच्यावतीने अधिकृतपणे पत्र देऊन निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे, राज्य सचिव अमोल भिसे व भागवत कांदे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. महत्वपूर्ण पद नियुक्ती आणि मार्गदर्शन कार्यक्रम चिपळूण येथे आयोजित करण्यात आला होता. संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष उमेश लटके, विभाग अध्यक्ष अरविंद ओबळकर, राजेंद्र गोंजारे अविनाश खेडेकर उपस्थित होते. आगामी निवडणुकांमध्ये मनसेचा झेंडा फडकवा’ या कार्यक्रमात जितेंद्र महाडिक यांच्या नियुक्तीसोबतच तालुक्यातील नागरिकांनी पक्षात प्रवेश केला. तसेच, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या पदांवर नियुक्त्‌यादेखील करण्यात आल्या. उपस्थितांना संबोधित करताना अध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी कार्यकर्त्यांना आगामी राजकीय वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. त्यांनी येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागण्याचे आवाहन केले. या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्याचा ध्यास आणि ध्येय मनात ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला सुरुवात करावी, असे आवाहन नागरगोजे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी, त्यांनी नवनियुक्त पदाधिकारी आणि पक्षात प्रवेश केलेल्या सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला, ज्याला पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नियुक्तीमुळे पक्षाला नवी ऊर्जा मिळणार असून, आगामी निवडणुकांत पक्षाची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. नियुक्तीबाबत जितेंद्र महाडिक यांनी सांगितले की मी गेली १५ वर्ष मनसैनिक म्हणून माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आलो आहे. त्यामुळे मला मिळालेल्या पदाचा वापर हा जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे. त्यामुळे जितेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मी या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जितेंद्र महाडिक यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg