loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात रोटरी स्कूलची सलग दुसऱ्यांदा दमदार कामगिरी

खेड (प्रतिनिधी) - शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी न्यू इंग्लिश स्कूल देवरुख व गुरुवर्य काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि सृजन इनोव्हेशन अ‍ॅण्ड ॲक्टिव्हिटी सेंटर, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये संपन्न झालेल्या 53 व्या रत्नागिरी जिल्हा विज्ञान प्रदर्शनात रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकावून उज्ज्वल यश संपादन केले आहे. या प्रदर्शनाचा मुख्य विषय 'विकसित आणि आत्मनिर्भर भारत स्टेम' असा होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदरच्या स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलमधील स्पंदन धामणे (इ. 8वी) व अर्णव परकाळे (इ. 8वी) या विद्यार्थ्यांनी इ. 6वी ते 8वी या प्राथमिक गटात ’कॅश्युशेलोरा’ हा प्रकल्प सादर केला. त्यांनी सादर केेलेल्या या प्रकल्पाला रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी या प्रकल्पाची निवड झाली आहे. स्पंदन व अर्णव या यशस्वी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

टाईम्स स्पेशल

वरील यशस्वी विद्यार्थ्यांना रोटरी स्कूलच्या विज्ञान विभागप्रमुख रिया पवार, शर्वरी धामणे, सर्व विज्ञान विषय शिक्षक तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg