मुंबई - नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत रत्नागिरी जिल्हयातच नव्हे तर कोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दारूण पराभव झाला आहे. एकेकाळी कोकण हा ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जायचा. त्या कोकणात आज १५१ पैकी फक्त १७ नगरसेवक उबाठाचे निवडून आले आहेत. विशेष म्हणजे कोकणात शिवसेनेची जी वाताहात झाली आहे त्याला एकनाथ शिंदेच जबाबदार असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगडमधील एकमेव आमदार भास्करशेठ जाधव यांनी केला आहे. ठाकरेंच्या या शिलेदाराने एका वृत्त वाहिनिला दिलेल्या मुलाखतीत महायुतीवर हल्लाबोल केला आहे.
राज्यात पुन्हा एकदा विधानसभेनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची धुळधाण झाली आहे. राज्यातील २८५ नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतल्या भाजपानं सर्वाधिक जागा जिंकत मोठा भाऊ झाला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेसह अजितदादांच्या राष्ट्रवादीनेही दमदार कामगिरी केली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात ४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीपैकी ६ ठिकाणी शिवसेना-भाजप महायुतीने निर्विवाद वर्चस्व राखले असून फक्त एका ठिकाणी महाविकास आघाडीने यश मिळविले आहे. पण या निवडणुकीत नुकसान पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेचे झाले असून १५१ नगरसेवकांपैकी त्यांचे फक्त १७ नगरसेवक निवडून आले आहेत. यावरून कोकणातील उबाठाचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी या पराभवाचे खापर शिंदेंच्या शिवसेनेवर फोडले आहे.
एका वृत्त वाहिनिला दिलेल्या मुलाखतीत आमदार जाधव यांनी, कोकणात ठाकरे सेनेला यश मिळाले नाही, ही गोष्ट खरी आहे हे मान्य केले. कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला फारसे यश मिळाले नाही, हे आम्ही कबुल करतो. पण त्याचबरोबर उभा महाराष्ट्रही हे कबुल करेल की, नाना तर्हेने उद्धव ठाकरे यांचा पक्ष तोडण्याचा, त्यांची माणसे विकत घेण्याचा त्यांना धाक दाखवण्यासह दपटशाही करून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला गेला. यानंतर सुद्धा आम्हाला यश मिळाले आहे. भलेही हे यश कमी असेल, पण यश मिळाले आहे. आमचे लोक या प्रचंड दादागिरी समोर, धनशक्ती समोर लढले. याचा अर्थ शिवसेनाप्रमुखांची पुण्याई कोकणात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचेच स्पष्ट होत आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, आता तुम्हीच म्हणाला होतात की अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. आमचे नेते घरी जरी बसले होते. तरी सुद्धा आम्हाला एवढे यश मिळाले. जर ते बाहेर पडले असते तर किती यश मिळाले असते आणि मग यांची अवस्था काय झाली असती. हे उभ्या महाराष्ट्रानेही बघितले असते असे आमदार जाधव म्हणाले.


















































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.