loader
Breaking News
Breaking News
Foto

निवडणूक म्हणजे प्रेम किंवा युद्ध नाही; जनतेसाठी सदैव कार्यरत राहणार - शिल्पा खोत

मालवण (प्रतिनिधी) - मालवण नगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा यतीन खोत यांनी आपला पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारत सर्व मालवणवासीयांचे आभार मानत 'शत प्रतिशत कृतज्ञता' व्यक्त केली आहे. "आकडे किंवा संख्यात्मक विजयापेक्षा मालवणच्या जनतेशी जोडले गेलेले नाते माझ्यासाठी अधिक मोलाचे आहे, अशी भावना खोत यांनी व्यक्त करतानाच निवडणूक म्हणजे प्रेम किंवा युद्ध नाही, जनतेच्या प्रश्नांसाठी यापुढेही आपण सदैव सक्रिय राहणार आहोत असे खोत यांनी सांगितले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण नगरपालिका निवडणूक निकालानंतर सौ. शिल्पा खोत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गेल्या नऊ वर्षांनंतर मालवणात लोकशाहीचा हा मोठा उत्सव पार पडला. गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रशासकीय कामाच्या माध्यमातून आणि आता निवडणूक प्रक्रियेच्या निमित्ताने मला जनसामान्यांच्या समस्या, गरजा आणि आनंद-दुःख जवळून अनुभवता आले. जनतेने मला दिलेला 'संयमी आत्मविश्वास' हा माझ्यासाठी सर्वात मोठा दागिना आहे. नगराध्यक्ष पदाचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नसला तरी, या प्रवासाने आगामी काळातील सकारात्मक घडामोडींची मुहूर्तमेढ रोवली आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "निवडणूक म्हणजे प्रेम किंवा युद्ध नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याची ती एक शक्ती आहे. जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला, तो मला भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा देईल," असेही त्यांनी नमूद केले.

टाइम्स स्पेशल

'आकाशापल्याड आणखी आकाश आहे' या जाणिवेत उगवत असलेल्या माझ्या आपल्या सोबतच्या नव्या पर्वासाठी मी सज्ज आहे. समाजकारणातून राजकारणाकडे जाताना आलेल्या अनुभवांनी आपली क्षमता अधिक प्रगल्भ केल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आणि मतदाराचे आभार मानताना त्यांनी 'शत प्रतिशत कृतज्ञता' व्यक्त केली आहे. मालवणच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी यापुढेही आपण सदैव सक्रिय राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg