loader
Breaking News
Breaking News
Foto

यशतेज फाऊंडेशनचे जनता बाजार उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

मंडणगड (प्रतिनिधी) - “मंडणगड घडवा, मंडणगड वाढवा आणि मंडणगड जगवा” या ब्रीदवाक्याखाली मंडणगड जनता बाजार या तालुक्याचे सामाजिक–आर्थिक विकासाचा भव्य उपक्रम 21 डिसेंबर 2025 रोजी मंडणगड येथे मोठ्या उत्साहात सुरु करण्यात आला. शहरातील लिटिल लॉर्ड्स इंटरनॅशनल ऍक्टिव्हिटी सेंटर, शिवाजीनगर येथे यशतेज फाऊंडेशनच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाला तालुक्यातील नागरिक, व्यापारी, महिला उद्योजिका, युवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मोठा प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमांचे निमीत्ताने महात्मा गांधी लायब्ररी, महात्मा गांधी लायब्ररी स्टडी रूम तसेच लिटिल लॉर्ड्स ऍक्टिव्हिटी सेंटर व प्ले ग्रुप यांचे एकत्रित उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. मुंबई–पुणे तसेच आसाम येथून आलेल्या मंडणगडकर मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमात बोलताना मंडणगड व्यापारी संघटना विधानसभा अध्यक्ष दीपक घोसाळकर यांनी नागरिकांना आवाहन केले की, रोजगारासाठी महानगरांमध्ये होणारे कर्त्या लोकसंख्येचे स्थलांतर थांबणे गरजेचे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आजच्या खुल्या आर्थव्यवस्थेत गावात राहूनही जगभर व्यापार करता येतो. मोबाईलवर एका क्लिकवर मार्केट उपलब्ध आहे. मंडणगडमध्ये राहूनही मोठा व्यवसाय उभा करता येऊ शकतो. यासाठी स्थानीक पातळीवर काही करता येणार नाही ही मानसीकता आधी बदलणे गरजेचे आहे. महानगरांत जाऊन निम्न स्तराचे जीवन व्यथीत करण्यापेक्षा स्थानीक पातळीवर संधी शोधा महिला उद्योजिका अध्यक्ष चारुलता पारेख यांनी कोकणातील उत्पादनांना जागतिक मागणी असल्याचे सांगत, “घरगुती व लघुउद्योगांच्या माध्यमातून आयात निर्यातीच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगीतले. स्थानिक महिलांनी व युवकांनी पुढे येऊन आर्थिक प्रगती साधावी,” असे आवाहन केले. दिवसभर चाललेल्या या उपक्रमात विविध स्टॉल्सद्वारे स्थानिक उत्पादने, लघुउद्योग, बचतगटांचे साहित्य, खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू यांची खरेदी–विक्री झाली. तसेच नेटवर्किंग, व्यवसाय सल्ला, डेमो आणि प्रेरणादायी बिझनेस टॉकमुळे युवक मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले.

टाईम्स स्पेशल

यश फाऊंडेशनचे या समाजपयोगी उपक्रमाचे तहसीलदार अक्षय ढाकणे, गटविकास अधिकारी सुनील खरात, पोलीस निरीक्षक नितीन गवारे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, गटशिक्षणाधिकारी कल्याणी मुळे, नगराध्यक्ष सोनल बेर्डे, मंडणगड बार असोसिएशन अध्यक्ष मिलिंद लोखंडे, व्यापारी संघटना अध्यक्ष प्रमोद काटकर आदी मान्यवरांनी शुभेच्छा देत कौतूक केले आहे. उपक्रम स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा आणि भविष्यकालीन विकासाचा नवा मार्ग दाखवणारा ठरणार असल्याचे मत नागरिकांनी मत व्यक्त होत आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी अँड. यश घोसाळकर यांच्यासह यशतेज फाऊंडेशन बिझनेस फोरम, राजे प्रतिष्ठान मंडणगड, महिला उद्योजीका मंडणगड, मैत्री फाऊंडेशन, शाहू फाऊंडेशन, उत्कर्ष मित्र मंडळ, नवचैतन्य मित्र मंडळ, मंडणगड शहर व्यापारी संघटना, रत्नागिरी जिल्हा औद्योगीक संघटना, नवचेतन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स वास्तल्य फिटनेस मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

स्थलांतर थांबवून स्थानिक व्यवसाय वाढवण्याचे आवाहन

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg