loader
Breaking News
Breaking News
Foto

दादर–रत्नागिरी पॅसेंजर बंदच; कोकणवासीयांच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

खेड - कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे सेवा अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. वारंवार मागणी व आंदोलने होऊनही रेल्वे प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक निर्णय न घेतल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दादर–रत्नागिरी पॅसेंजर ही सेवा विद्यार्थ्यांपासून ते नोकरदार, व्यापारी व ज्येष्ठ नागरिकांसाठी किफायतशीर आणि सोयीची होती. मात्र सेवा बंद राहिल्याने प्रवाशांना खासगी बस, एसटी किंवा महागड्या एक्सप्रेस ट्रेनवर अवलंबून राहावे लागत असून, त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणातील अनेक सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी ही पॅसेंजर सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार केली आहे. तरीही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप होत आहे. विशेषतः सण-उत्सव, सुट्ट्यांचा काळ तसेच पर्यटन हंगामात कोकणात येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. अशा वेळी पॅसेंजर सेवा बंद राहिल्याने प्रवास अधिक कोंडीचा व खर्चिक ठरत आहे. दादर–रत्नागिरी पॅसेंजर तात्काळ सुरू करावी, कोकणवासीयांच्या गरजा लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg