loader
Breaking News
Breaking News
Foto

आजपासून टाळसुरेत रंगणार बीच कबड्डी स्पर्धेचा रणसंग्राम

दापोली (प्रतिनिधी ) - २४ डिसेंबर पासून टाळसूरे येथील स्मित चायनीज सेंटर येथील भव्य मैदानावर अमर भारत टाळसुरे क्रिडा मंडळाने आयोजित केलेल्या बीच कबड्डी स्पर्धेचा रणसंग्राम रंगणार आहे . या कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील अष्टपैलू आणि एका पेक्षा एक अशा नामवंत खेळाडूंचा खेळ पाहण्याची सुवर्णसंधी येथील क्रिडाप्रेमींना उपलब्ध होणार आहे. दापोली तालुक्यातील अमर भारत क्रिडा मंडळ टाळसुरे या क्रिडा मंडळाचा कबड्डी खेळात महाराष्ट्रात दबदबा आहे. अशा या क्रिडा मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आणि दापोली तालूका कबड्डी असोसिएशनचे तत्कालीन उपाध्यक्ष तसेच रत्नागिरी जिल्ह्यात उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून ज्यांच्या नावाचा दबदबा होता असे प्रभाकर लाले यांचे अकाली दुःखद निधन झाले ही अमर भारत क्रिडा मंडळ टाळसुरेची मोठीच हानी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पूर्वीची. हुतूतू आणि आताच्या कबड्डी खेळात खेळाडू म्हणून टाळसुरे च्या बाबु लाले या अष्टपैल्यू खेळाडूच्या पश्चात या क्रीडा मंडळाची धुरा प्रभाकर लाले. हे समर्थपणे सांभाळत होते. उत्कृष्ट कबड्डी कोच म्हणून नावाजलेल्या प्रभाकर लाले यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये जिल्हास्तरासह राज्यस्तरावर कबड्डी खेळण्यासाठी स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देऊन अनेक खेळाडू तयार केले . अशा या प्रभाकर लाले यांच्या स्मृती कायमच दापोलीकरांच्या आठवणीत राहतीलच मात्र त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अमर भारत क्रिडा मंडळ , टाळसूरे यांच्या वतीने " प्रभाकरदादा स्मृती चषक राज्यस्तरीय बीच कबड्डी स्पर्धा २०२५ " ही कबड्डी स्पर्धा बुधवार दिनांक २४ डिसेंबर ते शनिवार दिनांक २७ डिसेंबर २०२५ दरम्यानच्या कालावधीत टाळसुरे येथील स्मित चायनीज सेंटर येथील मैदानावर रंगणार आहे.

टाइम्स स्पेशल

प्रभाकरदादा स्मृती चषक बीच स्पर्धा ही जिल्हा स्तरीय तसेच तालूका स्तरीय अशाप्रकारे घेण्यात येणार आहे यामध्ये २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता तालूकास्तरिय बीच कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन होणार असून २५ डिसेंबर व २६ डिसेंबर रोजी ६ वाजता जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेच्या साखळी सामन्यांचा थरार रंगणार आहे. २७ डिसेंबर रोजी ६ वाजता सेमी फायनल सामने सुरू होतील त्यानंतर अंतिम सामन्यांची लढत पाहता येईल. स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूंसाठी वैयक्तिक बक्षिसे जाहीर करण्यात आली असुन यामध्ये उत्कृष्ट चढाई पट्टू , उत्कृष्ट पक्कड आणि सामनावीर म्हणून बक्षीस देण्यात येणार आहेत.तर विजेत्या आणि उपविजेत्या संघांनाही रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg