loader
Breaking News
Breaking News
Foto

सोनगाव येथे आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन

वरवेली (गणेश किर्वे) - खेड तालुक्यातील सोनगाव येथे होणाऱ्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना उबाठा नेते, आमदार भास्कर जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अरूणा आंब्रे, तालुकाप्रमुख अंकुश काते, तालुका सचिव संदिप (बावा) कदम, युवा सेना तालुका प्रमुख डॉ. मच्छिंद्र गोवळकर, महीला तालुका संघटिका संजिवनी नरळकर, उपतालुकाप्रमुख विजय साळुंखे, विभागप्रमुख राजेंद्र घाग, सोनगाव सरपंच भारती पडवल, उपसरपंच मिलिंद घोरपडे, शाखाप्रमुख संजय खेराडे, दिपक घाग, उपविभाग प्रमुख नंदु कांबळे, जयवंत पालांडे, सुमित चव्हाण, सुरेश कारकर, प्रकाश खेराडे, नामदेव घाग, संदिप घाग, दिलीप दिवेकर, प्रवीण काते, उमेश महाडिक, चंद्रकांत गमरे, संजय कदम, रवींद्र खेराडे, विष्णू घाग, विलास नलावडे आनंद घाग, विनायक घाग ग्रामपंचायत सदस्य शेखर मोरे, समृद्धी जाधव, रेवा खेराडे, निशा खेराडे, निकिता किजबिले, यांच्या सह बहुसंख्य ग्रामस्थ व महीला यांची उपस्थिती लाभली. या कामासाठी चार कोटी, अडतीस लाख रुपये मंजूर झाले आहेत. सर्व जागा मालक व ग्रामपंचायत तसेच शिवसैनिक यांचे विशेष आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg