loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

कणकवली (प्रतिनिधी)- शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवीत कणकवलीचे नगराध्यक्ष बनलेले संदेश पारकर यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आशीर्वाद घेतले आहेत. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत कुडाळ मालवणचे शिवसेना आम. निलेश राणे यांनी संदेश पारकर यांच्या विजयासाठी जोरदार मेहनत घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर संदेश पारकर यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या भेटीमुळे नवीन राजकीय समीकरणे जुळणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत कणकवली शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी विजय मिळवला. नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर मुंबई येथे जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली व आशीर्वाद घेतले. या भेटीवेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खास. श्रीकांत शिंदे, माजी आमदार राजन तेली, प्रथमेश तेली यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या सहकार्याची आवश्यकता असल्याची भूमिका मांडली. “कणकवलीच्या नागरिकांना मी शहराचा कायापालट करण्याचे आश्वासन दिले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले मार्गदर्शन आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असावेत,” अशी भावना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदेश पारकर यांचे अभिनंदन करत कणकवलीच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन दिले. या भेटीमुळे कणकवली शहराच्या विकासकामांना नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg