loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये जिवलग मित्रांची मैत्री ठरली यशाची गुरुकिल्ली; माधवी बुटाला नगराध्यक्षपदी विराजमान

खेड (दिलीप देवळेकर) - खेड नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सौ. माधवी बुटाला यांनी भरघोस मताधिक्याने विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावले. या विजयामागे खेड शहरातील जिवलग मित्र संजय मोदी आणि राजेश बुटाला यांच्या अथक परिश्रमांची मोठी भूमिका राहिली आहे. अनेक वर्षांपासूनची त्यांची मैत्री केवळ व्यक्तिगत नात्यापुरती मर्यादित न राहता सामाजिक आणि राजकीय जीवनातही एक आदर्श ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संजय मोदी आणि राजेश बुटाला हे दोघेही नेहमी एकमेकांच्या सोबत दिसतात. सुख-दुःख असो वा कौटुंबिक कार्यक्रम, दोघांची उपस्थिती हमखास असते. त्यांच्या मैत्रीतला जिव्हाळा इतका घट्ट आहे की शहरात ते एकमेकांशिवाय अपूर्णच मानले जातात. याच जिव्हाळ्याच्या नात्याने खेड नगर परिषद निवडणुकीतही त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून देत काम केले. निवडणूक काळात दोघांनी जिवाजी बाजी लावत प्रत्येक प्रभागात प्रचार, मतदारांशी संवाद आणि संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग घेतला. त्याचा परिणाम म्हणजे सौ. माधवी बुटाला यांना मिळालेले भरघोस मताधिक्य आणि नगराध्यक्षपदावर झालेली निवड. त्यांच्या या यशात शिवसेना नेते रामदास भाई कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे मार्गदर्शन व पाठबळ सिंहाचा वाटा ठरले. संजय मोदी आणि राजेश बुटाला हे सुरुवातीपासूनच भाई कदम यांचे विश्वासू आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून खेड शहरात ओळखले जातात. दरम्यान, माधवी ताई नगराध्यक्ष घोषित झाल्यानंतर या दोन मित्रांनी एकमेकांना मिठी मारत आनंदोत्सव साजरा केला. डोळ्यांतून आनंदाश्रूंना वाट मोकळी करून त्यांनी आपल्या मेहनतीचे फळ मिळाल्याची भावना व्यक्त केली. हा भावनिक क्षण उपस्थितांच्या डोळ्यांतही पाणी आणणारा ठरला.

टाइम्स स्पेशल

आज ही मैत्री खेड शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. तीन बत्ती नाका परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरमुळे शहरासह संपूर्ण तालुक्यात या जिवलग मित्रांच्या मैत्रीची आणि त्यांच्या योगदानाची चर्चा रंगताना दिसत आहे. राजकारणात स्पर्धा असते, पण त्याही पलीकडे जाऊन निष्ठा, मैत्री आणि समर्पणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे संजय मोदी आणि राजेश बुटाला यांच्या उदाहरणातून खेडकरांना पाहायला मिळाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg