loader
Breaking News
Breaking News
Foto

पोस्को कंपनीच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानातून १०० मुली लाभान्वित

वावेदिवाळी इंदापूर (गौतम जाधव) - औद्योगिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व सी.एस.आर निधीतून ग्रामीण भागातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी एक आश्वासक पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेला बळ देत कंपनीने भागाड ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक पात्र बालिकेच्या नावे ५०,००० रुपयांची मुदत ठेव करण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबवला आहे. सन २०१७ पासून सुरु असलेल्या या उपक्रमाद्वारे आत्तापर्यंत १०० मुलींना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या योजनेचे मुख्य वैशिट्य म्हणजे, ही ५०,००० रुपयांची ठेव मुलगी १८ वर्षाची होईपर्यंत सुरक्षित राहते व १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याजासह मिळणारी ती रक्कम मुलीला तिचे उच्च शिक्षण किंवा व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी उपयोगात येते. आर्थिक टंचाईळे ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण अपूर्ण राहू नये हा या मागचा मुख्य उद्देश आहे. भागाड ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात २०२४ मध्ये जन्मलेल्या ५ मुलींना मान्यवरांच्या हस्ते मुदत ठेव प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी माणगावच्या गटविकास अधिकारी सौ. शुभदा पाटील यांनी कंपनीच्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “पोस्को कंपनीने केवळ उद्योग उभारला नाही तर इथल्या समाजाशी नाते जोडून मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याची संस्कृती रुजवली आहे. अश्या उपक्रमांमुळेच ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होत आहे.”

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमावेळी पोस्को महाराष्ट्र स्टीलचे वरिष्ठ अधिकारी श्री. जी युन पार्क यांनी कंपनीची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले मुलींचे सक्षमीकरण हा केवळ एका कुटुंबाचा नव्हे तर संपूर्ण राष्ट्राच्या विकासाचा पाया आहे. हा उपक्रम खरोखरच खास आहे, कारण तो भारत सरकारच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेशी सुसंगत आहे, जो लिंग समानता आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देतो. आम्ही स्थानिक समुदायांना त्यांच्या पायावर उभे करण्याकरिता प्रयत्न करत आहोत आणि भविष्यातही आमचा हा प्रयत्न अधिक व्यापक स्वरुपात सुरु राहील. या कार्यक्रमाला पोस्कोचे वरिष्ठ अधिकारी, गटविकास अधिकारी माणगाव, भागाड ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपरपंच, सदस्य, पदाधिकारी, मुलींचे पालक आदी उपस्थित होते. हा उपक्रम ही केवळ आर्थिक मदत नसून ग्रामीण भागातील मुलींना स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची संधी देणारा ठरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg