loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्ह्यातील जनतेच्या अन्यायकारक प्रश्नावर आर.पी.आय.आंदोलनात्मक भुमिका घेणार; जिल्हा सरचिटणीस प्रकाश कांबळे

साटेली (प्रतिनिधी) - विश्व भूषण डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम. डॉ. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष येत्या काळात जनतेच्या अन्यायकारक प्रश्नावर आवाज उठविणार आहे. जनतेचे विकासाचे व अन्यायकारक प्रश्न समजून घेण्यासाठी रविवार दि.४ जानेवारी कुडाळ तालुका व शनिवार दि. ११ जानेवारी मालवण तालुका दौऱ्याबाबत निर्णय बैठकीत घेण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दौरा कार्यक्रमात पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव - आयु. रमाकांत जाधव, जिल्हाध्यक्ष - आयु. अजितकुमार कदम, जिल्हा संघटक - आयु. ॲड. एस. के. चेंदवणकर, जिल्हा उपाध्यक्ष-आयु.संजय यादव, खजिनदार - आयु.आनंद पेंडूरकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका - आयुनी ज्योती रमाकांत जाधव, युवक जिल्हाध्यक्ष- आयु. ॲड. अशोक जाधव हे सहभागी होऊन मार्गदर्शन करणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस-आयु.प्रकाश कांबळे यांनी दिली. आयु्.प्रकाश कांबळे पुढे म्हणाले की, प्रत्येक तालुक्यात व गावा गावात शाखा निर्माण करण्यावर भर असेल तसेच जनतेचे रस्ता, पिण्याचे पाणी, समाज मंदिरे, स्मशानभूमी, अनुदानीत कर्ज प्रकरणे, जात प्रमाणपत्र याबाबतचे प्रश्न समजून घेण्यात येणार आणि अन्यायकारक प्रश्न प्रशासन पातळीवर मांडून प्रसंगी आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला.

टाइम्स स्पेशल

नुकतीच याबाबत सावंतवाडीत मॅंगो हॉटेलमध्ये बैठक प्रमुख पदाधिकारी यांची झाली, त्यात पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव-रमाकांत जाधव, जिल्हाध्यक्ष - अजितकुमार कदम ,जिल्हा सरचिटणीस - प्रकाश कांबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका - ज्योती रमाकांत जाधव, युवक जिल्हाध्यक्ष - ॲड.अशोक जाधव, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा जागृती सासोलकर, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस - निताली कांबळे, महिला आघाडी दोडामार्ग तालूकाध्यक्षा - सरीता पिळगांवकर, महिला आघाडी सदस्या - प्रतिभा कांबळे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg