loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरपा महाविद्यालयाच्या एन.एस.एस. शिबीरास प्रारंभ

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालूक्यातील शिक्षण प्रसारक मंडळ किरबेटचे प्रा.आबा सावंत कला व वाणिज्य महाविदयालय साखरपाचे शैक्षणिक वर्ष 2025- 26 चे राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीर दत्तक गाव देवडे येथील जि. प. प्रा. शाळा देवडे नंबर 1 मध्ये संपन्न होत आहे. शिबिराचे उद्घाटन कोंडगावचे माजी सरपंच व जिल्हा नियोजन समिती सदस्य बापू शेटये यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शिक्षण प्रसारक मंडळ किरबेटचे संचालक संतोष चव्हाण यांनी भूषवले. तसेच देवडे गावचे सरपंच विलास कांगणे , उपसरपंच रश्मी जंगम, ग्रामपंचायत सदस्य कविता धुमक, मनोज चाचे, तंटामुक्ति अध्यक्ष लक्ष्मण धुमक व देवडे शाळा नंबर 1च्या मुख्याध्यापिका सौ. विदया माने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. सौ.शिल्पा वैद्य यांनी केले. तसेच प्रमुख अतिथी बापू शेटये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात प्रा. संतोष चव्हाण यांनी पुढील सात दिवसात होणाऱ्या कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा घेतला व आपलं स्वास्थ्य सांभाळून शिबिरात सहभागी होण्याच्या विद्यार्थ्यांना सुचना दिल्या. या शिबिरात होणारे प्रमुख उपक्रम म्हणजे स्वच्छ भारत अभियान, अवयव दान , बेटी बचाओ बेटी पढाओ, No to Drug Yet to Life असे दुपारच्या सत्रात होणारे विचारवंतांचे व्याख्यान होणार आहे. तसेच ‘शिवछत्रपतींचा वारसा आणि आजचा युवा’ सतीश वाकसे ,’तरुणांना रोजगार व उद्योगाची संधी’ ओंकार कोलते, ‘करिअर व कौशल्य मार्गदर्शन ‘ अमेय मुळये, ‘कोकणातील परसबाग एक रोजगार’ चंद्रकांत कोळी आणि औषधोपचाराची सुरक्षितता प्रशिल चरकरी अशा प्रकारे मार्गदर्शन करणार आहेत .

टाइम्स स्पेशल

याव्यतिरिक्त पर्यावरण जनजागृती, क्षेत्रभेट व आरोग्य जागरूकता, नेत्र तपासणी शिबिर, जलसंधारण, पथनाट्य, बौद्धिक खेळ , रांगोळी स्पर्धा, महिला मेळावा व हळदीकुंकू, भिंत्तीचित्र स्पर्धा, संगणकीय प्रणाली इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. संपूर्ण शिबिरास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.आबाजी सावंत व संचालिका प्रा. सौ.गीतांजली सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. हे शिबिर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमअधिकारी प्रा. प्रसाद झेपले व सोनाली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg