loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात आशा सेविकांचा सन्मान : श्रमांना मिळालेली पडद्यावरील दाद

ठाणे (प्रतिनिधि) - समाजाच्या आरोग्यव्यवस्थेचा खरा कणा कोण असेल, तर उत्तर ठामपणे ‘आशा सेविका’ असेच द्यावे लागेल. गल्लीबोळातून, वस्तीवस्तीतून फिरत लसीकरण, मातृआरोग्य, कुटुंबनियोजन ते महामारीसारख्या संकटांपर्यंत त्यांनी जे काम केले, त्याचे मोल आकड्यांत मोजता येणार नाही. या निःशब्द सेवेला एक भावनिक आणि सांस्कृतिक सलाम ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. ठाणे महानगरपालिका आरोग्य विभाग आणि सामाजिक भान जपणारे डॉक्टर प्रसाद पाटील यांच्या पुढाकारातून ‘आशा’ या चित्रपटाचे खास मोफत शो आयोजित करण्यात आले. विवियाना मॉल, सिनेवंडर मॉल आणि कोरम मॉल या तीन ठिकाणी एकूण ६७० हून अधिक आशा सेविकांनी या चित्रपटाचा अनुभव घेतला. रोजच्या धावपळीत स्वतःसाठी वेळ काढणे ज्यांना शक्य होत नाही, त्यांच्यासाठी हा अनुभव केवळ चित्रपट पाहण्यापुरता मर्यादित नव्हता; तो आत्मसन्मानाचा क्षण होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

‘आशा’ हा चित्रपटही केवळ करमणूक देत नाही, तर समाजातील दुर्लक्षित घटकांच्या संघर्षाची जाणीव करून देतो. त्यामुळे आशा सेविकांसाठी हा चित्रपट अधिक जवळचा ठरला. पडद्यावर दिसणारी कथा आणि प्रत्यक्ष आयुष्यातील त्यांचा संघर्ष यामधील साम्य अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारे होते. या उपक्रमातून एक महत्त्वाचा संदेश दिला गेला आहे. आरोग्यसेवा म्हणजे केवळ रुग्णालये आणि डॉक्टर नव्हेत, तर त्या सेवेला खांदा देणाऱ्या हजारो महिलांचा अदृश्य परिश्रमही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांच्या कामाची दखल घेणे ही दानधर्माची गोष्ट नाही, तर सामाजिक जबाबदारी आहे. अशा उपक्रमांमुळे आशा सेविकांच्या कामाला केवळ प्रशासकीय मान्यता नाही, तर मानवी सन्मानही मिळतो. कदाचित हेच खरे ‘आशेचे’ चित्र आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg