loader
Breaking News
Breaking News
Foto

ओटवणे गावठणवाडी कला- क्रीडा व मित्र मंडळ आयोजित गाव चव्हाटा महोत्सव उत्साहात

सावंतवाडी (प्रतिनिधी) - ओटवणे गावठणवाडी कला क्रिडा मंडळ गेली १२ वर्षे मंडळ विविध समाजपयोगी उपक्रमांसह महोत्सवाचे आयोजन करताना स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत आहे, हे कौतुकास्पद आहे. तसेच मंडळाने सुसज्ज रंगमंच उभारून ग्रामीण भागातील मंडळासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यामुळे अशा उपक्रमशील मंडळांच्या आपण नेहमी पाठीशी राहू, असे प्रतिपादन सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ओटवणे गावठणवाडी कला क्रीडा व मित्र मंडळ आयोजित गाव चव्हाटा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी विक्रांत सावंत बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती अशोक दळवी, ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, तिलारी पाटबंधारे सावंतवाडी उपविभागीय अभियंता संतोष कविटकर, सामाजिक कार्यकर्ते बबलू गावकर, कृषी अधिकारी सुभदा कविटकर, गावप्रमुख रवींद्र गावकर, माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर, माजगाव माजी उपसरपंच संजय कानसे, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बाबाजी गावकर, कवी कृष्णा देवळी, प्रसिद्ध निवेदक राजा सामंत, गायक मयूर गवळी, तंटामुक्त समिती अध्यक्ष सगुण गावकर, मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर, रमेश गावकर, वायरमन समीर सावंत, अमोल गावकर, नामदेव गावकर, दशावतारी कलाकार कांता मेस्त्री, विठ्ठल गावकर, नाना गावकर, सुनिल मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

यावेळी अशोक दळवी यांनी मंडळाचे उपक्रम कौतुकास्पद असून मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची एकजूट आदर्शवत असल्याचे सांगितले. रवींद्र म्हापसेकर यांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. शुभदा कविटकर यांनी या मंडळाने आपल्या उपक्रमासह कामातून एक वेगळी ओळख निर्माण केली असून मंडळासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमात विक्रांत सावंत, अशोक दळवी, संतोष कविटकर, शुभदा कविटकर, राजा सामंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दहावीत प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या तन्वी गावकर, साक्षी गावकर, रिया सावंत, तन्वी गावकर, तसेच कोंकण विभागाच्या खोखो संघात निवड झालेल्या अनुष्का गावकर या सर्वांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मंडळाचे सचिव महेश गावकर तर आभार मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg