loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत मी गेलो असतो तर चांगला रिझल्ट मिळाला असता - विशाल परब

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपला विजय मिळाला नाही, ते जिव्हारी लागले आहे. मी तेथे गेलो असतो तर विजय मिळाला असता असे विधान भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी पत्रकार परिषदेत केले. राज्यात झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर सावंतवाडीत भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी सडेतोड पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले, तर राणे पिता-पुत्रांबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण विधाने केली.​विशाल परब म्हणाले की, राज्यात ३०० हून अधिक नगरपरिषदा आणि नगरपंचायती जिंकून भाजपने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या ऐतिहासिक विजयाचे खरे शिल्पकार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत. जिल्ह्यात भाजपला मिळालेला विजय हा चव्हाण, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेला विश्वास आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यातील विजयाचा उल्लेख करताना परब यांनी दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला. "दीपक केसरकरांच्या होमपिचवर आम्ही विजय मिळवला आहे. आता त्यांची जादू पूर्णपणे संपली आहे," असे मोठे विधान त्यांनी केले. विजयाने भारावून न जाता, सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन पुढील पाच वर्षांत विकासाचे मॉडेल उभे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ​नारायण राणे आणि निलेश राणे यांच्याकडून होणाऱ्या टीकेवर बोलताना विशाल परब यांनी संयमी पण रोखठोक भूमिका मांडली: ​नारायण राणे: "ते आमचे वरिष्ठ नेते आणि वडीलधारी आहेत. त्यांच्या विजयात माझाही खारीचा वाटा आहे. काही लोक त्यांना माझ्याबद्दल चुकीची माहिती देतात, त्या आधारे ते माझ्यावर बोलतात. पण मी त्यांच्यावर टीका करणार नाही."

टाइम्स स्पेशल

​निलेश राणे: "त्यांच्या कठीण काळात मी खंबीरपणे त्यांच्यासोबत होतो. त्यांच्या मनात काही गैरसमज असल्याने ते माझ्यावर टीका करतात, पण मी त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाही." ​कणकवलीतील पराभवाबाबत खंत व्यक्त करताना परब म्हणाले की, "कणकवलीचा निकाल जिव्हारी लागला आहे. जर मी तिथे गेलो असतो, तर कदाचित चित्र वेगळे असते आणि निकाल भाजपच्या बाजूने लागला असता." यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, "संजू परब हा माझ्यासाठी खूप लहान विषय आहे. ते केवळ एका प्रभागापुरते मर्यादित आहेत, मात्र विशाल परब हे आज कोणतेही पद नसताना राज्याचा विषय ठरत आहेत."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg