loader
Breaking News
Breaking News
Foto

नवी मुंबई विमानतळ थेट मुंबई विमानतळाशी जोडणार; नव्या टर्मिनल-धावपट्टीशिवाय ‘हवेत’ होणार अपग्रेड

नवी मुंबई - : मुंबईच्या विमान वाहतुकीत क्रांतिकारी बदल घडवणारा एक भन्नाट आणि अत्याधुनिक प्रयोग लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. या योजनेत ना मुंबई विमानतळावर नवीन टर्मिनल उभारलं जाणार आहे, ना धावपट्टीचा विस्तार केला जाणार आहे. तरीही मुंबई विमानतळाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ थेट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाशी हवेतून कनेक्ट केला जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा संपूर्ण प्रयोग एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट (ATM) आणि एअरस्पेस इंटिग्रेशनवर आधारित आहे. म्हणजेच भौतिक पायाभूत सुविधा न वाढवता, डिजिटल आणि तांत्रिक प्रणालींच्या माध्यमातून विमान वाहतूक अधिक कार्यक्षम केली जाणार आहे. यामुळे टेकऑफ आणि लँडिंगसाठी विमानांना आकाशात घिरट्या घालाव्या लागणार नाहीत आणि विलंब मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर दोन्ही विमानतळांसाठी कॉमन एअर ट्रॅफिक कंट्रोल कोऑर्डिनेशन तयार केलं जाणार आहे.टेकऑफ-लँडिंगचे वेळापत्रक समन्वयित; एअरस्पेसचा संयुक्त वापर यामुळे दोन्ही विमानतळ एकमेकांचे पूरक म्हणून काम करणार आहेत.

टाइम्स स्पेशल

कोणती प्रणाली अपग्रेड होणार?या प्रयोगाअंतर्गत खालील प्रणाली अपग्रेड केल्या जाणार आहेत— • Advanced Air Traffic Flow Management (ATFM)• AI आधारित स्लॉट अलोकेशन सिस्टीम• रिअल-टाईम फ्लाइट मॉनिटरिंग• डिजिटल कम्युनिकेशन (Controller–Pilot Data Link)• सॅटेलाइट आधारित नेव्हिगेशन (GNSS)या तंत्रज्ञानामुळे कमी जागेतून अधिक विमानांची सुरक्षित वाहतूक शक्य होणार आहे.प्रवाशांना काय फायदा?• फ्लाइट उशिरा येण्याचं प्रमाण कमी• कनेक्टिंग फ्लाइट्स अधिक सोप्या• रनवेवर होणारी गर्दी कमी, • वेळ आणि इंधनाची बचत, • विमान कंपन्यांचा खर्च घटणार

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg