loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्याच्या ३८ वर्षिय महिलेचे अवयवदान, अन् सहा रुग्णांना जीवदानाची भेट

ठाणे (प्रतिनिधी) - दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही ठाण्यातील एका कुटुंबाने घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे सहा रुग्णांना जीवदानाची अनोखी भेट मिळाली आहे. मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित झालेल्या ३८ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे एकाच वेळी सहा जणांचे प्राण वाचले असून, ठाण्यातील ही अशा प्रकारची पहिलीच घटना ठरली आहे. तिचे अवयव ठाणे मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये गेले आहेत. हाजुरी येथील रहिवासी असलेल्या या महिलेला मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे १९ डिसेंबर रोजी हाजुरी येथील महावीर जैन ट्रस्ट च्या महावीर जैन हॉस्पिटल व प्रताप आशर कार्डियाक सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने २५ डिसेंबर रोजी डॉक्टरांनी त्यांना ’ब्रेन डेड’ घोषित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कठीण काळात डॉक्टरांनी अवयवदानाचे महत्त्व पटवून देताच, कुटुंबीयांनी आपल्या भावना बाजूला सारून समाजाप्रती असलेल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. २६ डिसेंबर रोजी डॉ. विनीत रणवीर आणि त्यांच्या टीमने अवयव काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी केली. यामध्ये यकृत, दोन मूत्रपिंड (किडनी), हृदय, स्वादुपिंड आणि फुफ्फुस या सहा महत्त्वाच्या अवयवांचे दान करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने ’ग्रीन कॉरिडॉर’ करण्यात आला होता. ठाण्याहून पवईपर्यंतचे हृदय अवघ्या १७ मिनिटांत पोहोचवून एका रुग्णाचे प्राण वाचवण्यात आले. पाच अवयव मुंबईत तर एक अवयव ठाण्यातील रुग्णाला देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

महिलेच्या या उदात्त कार्याचा सन्मान म्हणून जैन ट्रस्ट आणि महावीर जैन हॉस्पिटलतर्फे त्यांच्या ९ वर्षीय मुलीच्या भविष्यासाठी प्रत्येकी एक लाख, असे एकूण दोन लाख रुपयांच्या एफडीचा (मुदत ठेव) धनादेश देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. ब्रेन डेड झाल्यानंतर ठराविक वेळेत अवयवदान होणे गरजेचे असते. नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती झाल्यास अनेक गरजूंचे प्राण वाचू शकतात. डॉ. विनीत रणवीर, महावीर जैन हॉस्पिटल. या घटनेने केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे, तर संपूर्ण समाजात मानवतेचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. एका आईने जाताना सहा जणांच्या आयुष्यात दिलेला प्रकाशाचा दिवा हीच खर्‍या अर्थाने तिची मोठी श्रद्धांजली ठरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg