loader
Breaking News
Breaking News
Foto

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी अजयराज वराडकर यांची फेरनिवड

मालवण (प्रतिनिधी) - योगात्मा डॉ. काकासाहेब वराडकर यांनी स्थापित केलेल्या कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली आहे. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची सन २०२४-२५ ची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त कट्टा येथील गुरुदक्षिणा हॉलमध्ये संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. यावेळी सिंधुदुर्गातील उपक्रमशील वराडकर हायस्कूलच्या शतकमहोत्सवी वर्षी सिंधुदुर्गातील आदर्श आणि नामांकित कट्टा पंचक्रोशी शि. प्र. मंडळाच्या वार्षिक सभेत कार्यकारिणीत काम करणेसाठी आलेल्या सर्व पंधरा अर्जंचा विचार होऊन सन २०२५-२६ ते २०२७-२८ कालावधीच्या नव्या कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सभेत प्रथेनुसार संस्था विश्वस्त निवृत्त कर्नल शिवानंद वराडकर आणि ॲड. एस. एस. पवार यांनी दोन विश्वस्त आणि कार्यकारणीची घोषणा केली. ती पुढील प्रमाणे अध्यक्ष - अजयराज शरद वराडकर, उपाध्यक्ष - आनंद मधुकर वराडकर, उपाध्यक्ष - शेखर सदानंद पेणकर, सचिव - सुनील बंधुकांत नाईक, सचिव - विजयश्री श्रीकांत देसाई, सहसचिव - साबाजी देविदास गावडे, खजिनदार - रविंद्रनाथ बाळकृष्ण पावसकर, संचालक अनुक्रमे सुधीर चंद्रकांत वराडकर, महेश दिगंबर वाईरकर, श्रुती शिवानंद वराडकर , स्वाती सुधीर वराडकर, आनंद रमेश टेमकर, नितीन शशिकांत गिरकर यांची संचालक म्हणून एकमतानी अविरोध निवड करण्यात आली. तसेच संस्थेचे सल्लागार म्हणून संस्था माजी विद्यार्थी उद्योजक नारायण पेणकर, अर्थतज्ज्ञ सुहास वराडकर, उद्योजक संतोष साटविलकर, आणि उद्योजक व्हिक्टर डॉन्टस यांची निवड करण्यात आली आहे .

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg