loader
Breaking News
Breaking News
Foto

महाविकास आघाडी संघटीतपणे लढली तेथे भव्य यश

रत्नागिरी (टाइम्स डेस्क) - रायगड जिल्ह्यात जिथे महाविकास आघाडी एकत्र राहिली, तेथे भव्य यश मिळाल्याचे समोर येत आहे. अलिबाग शहरात शेतकरी कामगार पक्षाने कॉंग्रेस आय. पक्षाच्या बळावर सत्ता काबीज केली. तेथे नगराध्यक्षपदी अवघ्या २३ वर्षाच्या अक्षया नाईक नगराध्यक्ष झाल्या. तर उरणमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भावनाताई घाणेकर नगराध्यक्ष झाल्या. तेथे आघाडीच्या पक्षांचे पाठबळ लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रोहा शहरात राष्ट्रवादी पुन्हा विजयी झाली आहे. वनश्री शेडगे तेथे नगराध्यक्ष झाल्या आहेत. मुरुड नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आराधना दांडेकर विजयी झाल्या. महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाने नगराध्यक्ष पद पटकावले. तेथे शिवसेनेचे सुनील कविस्कर नगराध्यक्ष झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला महाडमध्ये १० जागा मिळाल्या तर शिवसेना शिंदे गटाला ८ जागा मिळाल्या. तसेच २ जागांवर भाजपा विजयी झाली. खोपोली नगरपरिषदेत शिवसेनेचा दणदणीत विजय झाला. तेथे राष्ट्रवादीला पराभाव स्वीकारावा लागला. कुलदीप शेंडे तेथे नगराध्यक्ष झाले. जेथे महाविकास आघाडी संघटितपणे लढली, तेथे भव्य यश प्राप्त झाले आहे. रायगड जिल्ह्यात सत्ताधारी भाजप-शिवसेनेला विरोधी पक्षानी रोखून धरल्याचे दिसून येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg